आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • There Is No Service In The Aircraft Manufacturer's Village; The Sentiments Of Maharashtra Chamber Of Commerce President Lalit Gandhi| Marathi News

भावना:विमान निर्मिती करणाऱ्यांच्या गावातच सेवा नाही; महाराष्ट्र चेंबर आॅफ काॅमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या भावना

साेलापूर5 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूरचे सुपुत्र आणि देशात सर्वप्रथम विमान बनवण्याचा कारखाना उभारणाऱ्या शेठ वालचंद हिराचंद यांच्या गावातच विमानसेवा नाही, हे अतिशय दुर्दैवी आहे. दूरदृष्टी असलेल्या उद्योजकाच्या शहरात विमानसेवा हवीच, असे स्पष्ट मत महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष ललित गांधी यांनी मांडले. हाेटगी रस्त्यावरील विमानतळावरून नागरी सेवा देण्याच्या मागणीसाठी सुरू झालेल्या चक्री उपाेषणाला त्यांनी पाठिंब्याचे पत्र पाठवले. त्यात त्यांनी हे परखड मत मांडले.

शेठ वालचंद हिराचंद यांनी महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग क्षेत्रातील विकासासाठी १९२७ साली महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना केली. राज्यभरातील ८०० व्यापारी, औद्योगिक संघटना, ७ लाखांहून अधिक उद्योग, ३० लाखांहून अधिक व्यापाऱ्यांचे नेतृत्व महाराष्ट्र चेंबर करत आहे. सध्याच्या युगात विमानसेवा ही अत्यावश्यक बाब बनली आहे.

होटगी रोड विमानतळावरून नागरी विमानसेवा सुरू व्हावी, ह्यासाठी महाराष्ट्र चेंबर ही सातत्याने प्रयत्नशील असून, केंद्रीय नागरी उड्डानमंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांना निवेदनही दिले, असेही श्री. गांधी म्हणाले.सोलापुरात विमानसेवा सुरु व्हावी यासाठी सोलापूर विकास मंचतर्फे गेल्या १९ दिवसापासून आंदोलन सुरू आहे.

महाराष्ट्र चेंबरची रविवारी दुपारी साेलापुरात बैठक
साेलापूर विचार मंचच्या वतीने रविवारी दुपारी १२ वाजता विमानसेवेविषयी बैठक आयाेजित केली आहे. हाॅटेल प्रथम येथे हाेणाऱ्या या बैठकीसाठी महाराष्ट्र चेंबरचे अध्यक्ष ललित गांधी उपस्थित राहणार आहेत. विमानसेवेसाठी झटणाऱ्या व्यक्ती, संस्थांना त्याचे खुले आमंत्रण असल्याचे डॉ.संदीप आडके यांनी कळवले.

पाठिंब्याचा ओघ सुरूच
साेलापूर विकास मंचच्या वतीने सुरू झालेल्या चक्री उपाेषणाच्या १९ व्या दिवशीही पाठिंबा देण्यासाठी लाेकांचा आेघ सुरूच हाेता. बांधकाम व्यावसायिक शैलेश करवा, व्यंगचित्रकार उन्मेष शहाणे, फोटोग्राफर्स वेल्फेअर असोसिएशनचे अध्यक्ष पुरुषोत्तम वग्गा, फोटो लॅब असोसिएशन अध्यक्ष गणेश कटकधोंड आदी पाठिंब्याची पत्रे देऊन सक्रिय झाले.

बातम्या आणखी आहेत...