आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी वाढली:केंद्र सरकारकडून लसपुरवठा नाही जिल्ह्याकडील साठा तर संपत आला

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

केंद्र सरकारकडून कोरोना संसर्गाच्या संभाव्य चौथ्या लाटेच्या अनुषंगाने बचावासाठी उपाय योजना, काळजी घेण्यासाठी आवाहन केले जात आहे. मात्र कोरोना प्रतिबंधक लसीचा पुरवठा नाही. केंद्र सरकारकडे कोविशिल्ड आणि कोर्बोव्हॅक्सचा साठा उपलब्ध नाही. त्यामुळे तो राज्यास आणि राज्याकडून जिल्ह्याला मिळेना.

मागणी करूनही लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. जिल्ह्यात सध्या कोविशिल्ड, कोर्बाेव्हॅक्स लसीचा तुटवडा आहे. फक्त १७ हजार ८१० कोव्हॅक्सीन लसीचा साठा जिल्ह्याकडे उपलब्ध आहे. जिल्ह्याला आतापर्यंत ५५ लाख ६२ हजार ३० एवढा लसीचा साठा मिळाला. त्यातून पहिला डोस ३२ लाख व दुसरा डोस २४ लाख, तर प्रिकॉक्शन डोस पावणे दोन लाख जणांना देण्यात आला आहे. मात्र सध्या कोरोना संसर्गाचे प्रमाण नगण्य आहे. तरीही लस घेऊन स्वत:ला सुरक्षित केले पाहिजे, असे आवाहन प्रशासनाकडून होत आहे. मात्र आरोग्य केंद्रातच लस नसेल तर ती कुठून घ्यायची? असा प्रश्न नागरिकांपुढे आहे.

कोर्बाेव्हॅक्सची ७.७६ टक्के वाया कोविशिल्ड ०.६५ टक्के, कोवॅक्सिन लस २.५ टक्के वाया गेली. कोर्बोव्हॅक्स वाया जाण्याचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. तिचा ७.७६ टक्के साठा वाया गेला. साधारणपणे दहा टक्के वाया जाण्याचे प्रमाण गृहित धरलेले असते, असे प्रशासनाने सांगितले. जिल्ह्याला आजपर्यंत कोविशिल्ड ४७ लाख ९० हजार ४५०, कोव्हॅक्सिन ४ लाख ९३ हजार १४०, तर कोर्बोव्हॅक्स २ लाख ७९ हजार एवढी लस मिळाली आहे.

विद्यार्थी घेणार कोठे? जिल्ह्यात एकुण ३४ लाख जणांना लस देण्याचे लक्ष्य होते. एकूण ८८ टक्के म्हणजे ३२ लाख ६२ हजार जणांना पहिला डोस तर, ६९ टक्के म्हणजे २४ लाख ४९ हजार जणांना दुसरा डोस दिला आहे. फक्त १ लाख ७७ हजार जणांनी तिसरा डोस घेतला आहे. म्हणजे प्रिकॉक्शन डोस घेणाऱ्यांचे प्रमाणही कमी आहे. सध्या काही खासगी शाळांमधील विद्यार्थ्यांना लस घेऊन येण्यासंदर्भात सांगितले जात आहे. पण, १२ ते १८ वर्षांच्या मुला-मुलींना देण्यात येणारी कोर्बोव्हॅक्स लसच उपलब्ध नाही. मग त्यांनी ती घ्यायची कोठून असा प्रश्न पालक उपस्थित करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...