आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा परिषदेचे आषाढी वारीचे सूक्ष्म नियोजन:सीईओ स्वामींनी दिल्या सूचना; म्हणाले - भाविकांनी सेवेसाठी शासकीय आदेशाची वाट पाहू नये

सोलापूरएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनाची दक्षता घेणे यासाठी पालखी मार्गावर विलगीकरण व तपासणी कक्ष उभारण्यात येणार आहे. भाविकांनी सेवेसाठी शासकीय आदेशाची वाट पाहू नका असे भावनिक आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे सीईओ दिलीप स्वामी यांनी केले आहे.

जिल्हा परिषदेचे गटविकास अधिकारी व जिल्ह्यातील पाच पालखी मार्गावरील संबंधित अधिकारी व कर्मचारी व ग्रामसेवक यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी इशाधिन शेळकंदे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अजय पवार, गटविकास अधिकारी उपस्थित होते.

स्वतंत्र शौचालय सुविधा

यात्रा कालावधीत महिलांची मोठी कुचंबना होते. महिलांसाठी स्वतंत्र शौचालय सुविधा करण्यात येणार आहे. 8 हजार शौचालयामध्ये 50 टक्के शौचालये महिलांसाठी आरक्षित असणार आहे, दर पाच किमीवर सुविधा देण्यात येत आहे. खाजगी, सार्वजनिक सुचना फलक देखील लावण्यात आले आहे. माता बालक यांच्यासाठी कक्ष करण्यात येणार आहे. यासाठी स्वतंत्र महिला अधिकारी व कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात येत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.

प्लास्टिक संकलन केंद्र

पालखी मार्गावर प्लास्टिकचा मोठ्या प्रमाणावर कचरा तयार होतो. हा कचरा रोखणे साठी स्वयंशिस्त असलेले वारकरी यांना प्रबोधन करून मार्गावर प्लास्टिक कचरा संकलन केंद्र तयार करण्यात येत आहे.

पालखी मार्गावर सुविधा

पालखी मार्गावर वीज, पिण्याचे पाणी व आरोग्य सुविधा यामध्ये कुठलाही हालगर्जीपणा चालणार नाही. प्रत्येक कामात आदेशाची वाट पाहू नका. चांगल्या सुविधा द्या. थेट संपर्क करा. पावसाळ्याचे दिवस असल्याने काळजी घ्या असे आवाहन करण्यात आले आहे.