आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करादरवाजा उघडा असलेल्या एका घरात भर दिवसा चोर शिरला. बेडरूमला आतून कडी लावून चोरी करू लागला. पत्नी घरकामात व्यस्त अन् पती बाहेरून घरात आले. दार बडवूनही चोरटा बाहेर येईना. शेवटी दरवाजा उघडून पळण्याचा प्रयत्नात घरमालकाने त्याला पकडून पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.
वसंत विहार, सायली हाइट्स येथील एका घरात हा प्रकार घडला. सोमनाथ हरिदास सुरवसे (वय ३४, तोडकर वस्ती, बाळे) याच्यावर बुधवारी मध्यरात्री फौजदार चावडी पोलिसांत गुन्हा दाखल झाला. श्रीकांत बबन बनपट्टे यांनी फिर्याद दिली आहे. बनपट्टे हे नोकरीकरता घरातून बाहेर गेले होते. ते जेवण करण्यासाठी घरी आले तेव्हा बेडरूमला आतून कडी पाहिली.
कडी उघडून बनपट्टे यांना धक्का देऊन पळून जाण्याचा प्रयत्न करताना त्यास पकडण्यात यश आले. त्या आरोपीला पोलिसांच्या ताब्यात दिले असून त्याच्यावर गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल घुगे करीत आहेत.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.