आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तापमानात पाच अंशांनी घट:यंदाच्या मोसमातील कमी तापमानाची नोंद

सोलापूर13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व परिसरात थंडीचा कडका वाढला आहे. तापमानाचा पारा हळूहळू खाली जात आहे. नाेव्हेंबर महिन्यातील तापमान कमाल तापमान हे ३० ते ३२ अंश सेल्सिअस असते. तर किमान तापमान १८ ते २० अंशादरम्यान असते. पण या महिन्यातील शनिवारी १६ , रविवार १४.६ तर साेमवारी १२.७ अंश तापमान नाेंदविले गेले. गेल्या तीन दिवसात साेलापुरातील तापमानात पाच अंशाने घट नाेंदविली गेली.

साेलापुरात सामान्यत: २२ डिसेंबरच्या आसपास वर्षातील सर्वात तीव्र थंडी अनुभवला जातो. तर सर्वांत जास्त तापमान मे च्या पहिल्या आठवड्यात असतो. यंदा मात्र नोव्हेंबर महिन्यात १३ अंशापेक्षा कमी तापमान नोंदविले गेले आहे. पुढील दोन ते तीन दिवसात साेलापुरातील किमान तापमान १२ अंशाच्या आसपास स्थिरावेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. थंडीपासून बचाव करणारे स्वेटर, मफलर खरेदीसाठी गर्दी वाढली आहे. तसेच रात्री थंडीमुळे लवकरच शुकशुकाट होत असल्याचे चित्र आहे.

बातम्या आणखी आहेत...