आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

माझा विठ्ठल माझी वारी:कोरोना संकटानंतर यंदा 2 वर्षांनी एसटी महामंडळ आषाढीवारीचे नियोजन जंगी करणार

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेल्या दोन वर्षात सततच्या कोरोना परिस्थितीमुळे आणि नंतर संपामुळे वारीचे नियोजन एसटीच्या दृष्टीकोनातून योग्य असे झाले नाही. मात्र, यंदाच्या वर्षी कोणतेही अडसर नाही. त्यामूळे आषाढी वारीचे यंदा जंगी नियोजन करणार असून लवकरच 14 जूनला एसटी महामंडळ आणि जिल्हा प्रशासन मिळून या सर्व गोष्टी ठरवतील, अशी माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे.

प्रशासनाच्या मताप्रमाणे किमान चार हजार झाडे यंदाच्या वर्षी संपूर्ण राज्यातून फिरवायचे नियोजन केले जाणार आहे. तर पूर्वी जिल्हा प्रशासनाच्यावतीने काय प्रस्ताव असणार आहे. कोणत्या बाबीची अंमलबजावणी करायची आहे. याबाबतचा विचार आणि सल्लामसलत होणार असून त्यानंतरच आकडेवारी जाहीर केली जाणार आहे, अशीही माहिती प्रशासनाने दिली आहे.

जास्त गाड्या लागणार

गेल्या अनेक वर्षांपासून एसटी महामंडळ वर्षाकाठी पंढरपूर येथे होणाऱ्या विठ्ठल-रुक्मिणीच्या आषाढी वारीकरिता राज्यातील इतर विभागाच्या दीड ते दोन हजार बारा मागवतात, यंदा याचे प्रमाण अधिक असणार असून येणारी आषाढी वारी एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून सेवा देण्यासाठी सर्वात मोठी असावी, असा प्रयत्न केला जाणार आहे, असाही अंदाज प्रशासनाने वर्तविला आहे.

14 ला बैठक आहे

जिल्हा प्रशासनाने पंढरपूरच्या तहसीलदारांनी सोबत 14 जून रोजी मोठी बैठक ठेवली आहे. या बैठकीत वारीचे नियोजन कशा पद्धतीचे असेल याबाबत चर्चा केली जाणार आहे त्यानंतर सर्व गोष्टी ठरतील. मात्र यंदा ची वारी एसटी महामंडळाच्या दृष्टिकोनातून उत्साही आणि भव्य व्हावी असा प्रयत्न असणार आहे, विभागीय वाहतूक अधिकारी सुरेश लोणकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...