आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर येथे साजरा होणाऱ्या शिवजन्माच्या पाळणा महोत्सवाला दरवर्षी महिलांची वेगवेगळी वैशिष्ट्यपूर्ण अशी वेशभूषा असते. यंदा त्या ‘जिजाऊं’च्या वेशभूषेत असणार आहेत. शिवकालीन आणि नऊवारीचा थाट असणारी वेशभूषा महिला साकारणार आहेत. तब्बल वीस हजार महिला शहर-ग्रामीण भागातून महोत्सवासाठी शिवाजी चौकात जमणार आहेत, अशी मध्यवर्ती शिवजन्मोत्सव मंडळाचे अध्यक्ष, माजी नगरसेवक नाना काळे यांनी दिली.
नऊवारी काठपदर, नऊवारी ईरकल, सहावारी ईरकल, पैठणी, शेला (ऐच्छिक), कोणतीही काठपदर साडी केशरचना, अंबाडा, गजरा, डोक्यावरून पदर. सर्व पारंपरिक दागिने असणार आहेत. यात नथ, कानातली चंद्रकोर, कुंकू ठुशी, वज्रटीक, कोल्हापुरी साज, मोहनमाळ, काळी पोत, पाटल्या, बांगडी, बाजुबंद, लक्ष्मीहार, जोडवी, पैंजण, साखळी, तोडे असे दागिने वापरण्यात येणार आहेत. अापापल्या सोयीनुसार व आपल्याकडील उपलब्धतेनुसार पारंपरिक वेषात येण्याचे आवाहन संयोजकांनी केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.