आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती:सोयाबीनला यंदाचा सर्वाधिकप्रति क्विंटल 6 हजार रुपये दर

सोलापूर21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

यंदाच्या अतिवृष्टीने सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट झाली आहे. परिणामी बाजारात आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत आहे. ऑक्टोबर महिन्यात ४ ते ५ हजारावर असलेले सोयाबीनचे दर नोव्हेंबरच्या पहिल्याच आठवड्यात ६ हजारावर गेले आहेत. सोलापूर व चिखली बाजार समितीमध्ये सोयाबीनला यंदाचा सर्वोच्च ६ हजार रुपये प्रती क्विंटल इतका दर मिळाला आहे. उत्पादनात झालेली घट पाहता भविष्यात दरात आणखी वाढ होण्याची दाट शक्यता आहे.

मागील वर्षी अचानक १० हजारांवर गेलेला दर आवक होताच ५ हजारांवर आला होता. यंदा सोयाबीनची आवक सुरू होताच दरात तेजी दिसत आहे. ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबर महिन्यात प्रती क्विंटल सरासरी १ हजाराची वाढ झाली आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये होत असलेली आवक व दर पाहता आवक घटताना तर दर वाढताना दिसत आहे. लातूर, अमरावती, नागपूर, लासलगाव, माजलगाव, सोलापूर यासह प्रमुख बाजार समित्यांमध्ये आवक कमी आहे पण दरात तेजी दिसून आली.

उत्पादनापेक्षा खर्च जास्त, सोयाबीन उत्पादक हतबल
मजुरांचे वाढवलेले काढणीचे दर, मळणीसाठी यंत्रचालकांनी केलेली दुप्पट भाववाढ यामुळे सोयाबीन उत्पादनापेक्षा खर्च जास्त होत आहे. अतिवृष्टीमुळे उत्पादनात मोठी घट झाली. यावर्षी दरही नीचांकी पातळीवरच आहेत. यामुळे सोयाबीन शेती तोट्यात गेली आहे.गेल्या चार-पाच वर्षांत सोयाबीन पिकाला बाजारातील मागणीमुळे क्षेत्र वाढू लागले आहे. मात्र यावर्षी अतिवृष्टीमुळे सोयाबीन उत्पादनाचे गणित बिघडले आहे. सोयाबीन काढणी प्रतिएकरी घेण्यावरच मजुरांचा कल दिसत आहे. मजुरांसोबत मळणी यंत्रधारकांनीही सोयाबीन भरडण्याचे दर प्रतिगोणी दुप्पट केले आहेत.

गतवर्षीच्या तुलनेने सोयाबीनचे दर कमी आहेत. गेल्या वर्षी सोयाबीनचे दर प्रतिक्विंटल सरासरी आठ हजार रुपयांपर्यंत होती. त्यामुळे उत्पादनाचे गणित पाहता शेतकऱ्यांच्या हातात काहीच शिल्लक राहणार नाही. सोयाबीन काढणीसाठी प्रतिएकरी चार ते पाच हजार काही ठिकाणी हा दर सात हजार मोजावे लागतात. याशिवाय या महिला मजुरांना शेतापर्यंत येण्या-जाण्यासाठी वाहनाची सोय करावी लागत आहे. त्याचा भुर्दंड वेगळाच. गेल्या वर्षी सोयाबीन भरण्यासाठी प्रति गोणी दीडशे ते दोनशे रुपये इतका दर मळणीयंत्रवाले आकारात होते यावर्षी त्यांनी आपला दर तीनशे रुपयांपर्यंत वाढवला आहे. तर आम्ही शेती करावी कशी? असा सवाल वडाळा येथील शेतकरी योगेश शितोळे यांनी केला.

पावसाचा सोयाबीनला फटका
अतिवृष्टीमुळे व सततच्या पावसामुळे सोयाबीन पिकास मोठा फटका बसला आहे. ऑक्टोबर महिन्यात झालेल्या पावसाने सोयाबीन पाण्यात गेले आहे. सरासरी उताऱ्यात ५० टक्केहून अधिक घट येत आहे. यामुळे सोयाबीनच्या उत्पादनात ३० ते ४० टक्के घट होण्याचा अंदाज आहे. अद्यापही बाजारात म्हणावी तशी आवक होत नाही. या महिन्यात दरवाढीवरून येणाऱ्या काळात दरात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही.'' - बसवराज इटकळे, आडत व्यापारी, सोलापूर.

बातम्या आणखी आहेत...