आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोला:पूर्वी एकमेकांना पाण्यात पाहणारे एकत्र येताहेत : देवेंद्र फडणवीस

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जे आमच्या विरोधात एकत्र येत आहेत ते पूर्वी एकमेकांना पाण्यात पाहत होते, एकमेकांचा चेहराही पाहत नव्हते. ते आता एकत्र येताहेत. वेळ येईल तेव्हा आम्ही सगळ्यांचा एकत्र मुकाबला करू, असे प्रत्युत्तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना-वंचित बहुजन आघाडी एकत्र येण्याच्या प्रश्नाला उत्तर देताना दिले.

पंढरपूर विकास आराखडा तिरुपतीच्या धर्तीवर तयार करण्यात आलेल्या आराखड्याबाबत भोगोलिक परिस्थिती विचारात घेऊन आराखडा तयार केला जातो. तिरुपतीचा आराखडा पण गरजेनुसार १० वेळा बदल करण्यात आला आहे. भाविकांना रांगेत जास्त वेळ लागणार नाही, भाविकांना अधिकाधिक सुविधा कशा मिळतील याचा विचार आम्ही आराखडा तयार करताना करत आहोत. त्या पद्धतीने कामे करण्यात येतील. तिरुपतीला गर्दी काळात पण दर्शनासाठी प्रतीक्षा करावी लागतेच. यामुळे भाविकांना जो पॅटर्न सोयीचा आहे, तो पॅटर्न आम्ही पंढरपूरला राबवू, असे फडणवीस यांनी सांगितले.

आधी मला आषाढी एकादशी, आता कार्तिकी एकादशीला महापूजेचा मान मिळाला आहे. लोकांमध्ये उत्साह आहे. भाविकांची मोठी गर्दी आहे. महाराष्ट्र सुजलाम सुफलाम व्हावा, राज्यातील जनता सुखी असावी, महाराष्ट्र संपन्न व्हावा ही श्री विठ्ठलाकडे प्रार्थना असणार आहे, असे ते म्हणाले.

ते कोणाची चाकरी करतात ? महाराष्ट्र राज्यात येणारे अनेक प्रकल्प गुजरातला गेले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे गुजरातची चाकरी करतात, अशी टीका प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. याला उत्तर देताना उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी ते कोणाची चाकरी करतात हे संपूर्ण राज्याला माहिती आहे, असा टोला लगावला.

बातम्या आणखी आहेत...