आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लोक सुख-समाधानाने जगत:महापुरुषांच्या विचारांची जपणूक व्हावी : थोरे

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समाजाला गुलामगिरीच्या जोखडातून बाहेर काढण्याबरोबरच महापुरुषांनी प्रगतीचे दारे खुली करून दिली. त्यामुळेच आज महाराष्ट्रच नव्हे तर संपूर्ण देशातील लोक सुख-समाधानाने जगत आहेत. इतकेच नव्हे तर बहुजन समाजानेही मोठी प्रगती साधली आहे. पुढील काळात अधिक सामर्थ्यशाली आणि बलवान व्हायचे असेल तर महापुरुषांच्या विचारांची जपणूक अधिक कटाक्षाने करण्याची गरज आहे, असे मत व्याख्याते दत्ता थोरे यांनी व्यक्त केले.

दोड्डी (ता. दक्षिण सोलापूर) येथील जय महाराष्ट्र नवरात्रोत्सव तरुण मंडळाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ‘छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार आणि समाज’ या विषयावर ते बोलत होते. थोरे म्हणाले, शिवरायांप्रमाणेच आपल्या महाराष्ट्रात महात्मा ज्योतिबा फुले, शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती संभाजी महाराज यांचे कार्य खूप मोठे आहे. या महापुरुषांनी एका जातीसाठी काम केले नाही. सर्व समाजासाठी त्यांनी कार्य आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांना शिक्षणांचा, शाहू महाराज यांनी ५० टक्के आरक्षण आणि डॉ. बाबासाहेबांनी घटनेच्या माध्यमातून सर्वसामान्य माणसाला स्वातंत्र्याचा अधिकार दिला. आपल्या मुलांना महापुरुषांच्या विचारांची माहिती आजच्या पालकांनी दिली पाहिजे. यासाठी आपल्या मुलांना चांगले शिक्षण द्या. शिक्षणात मोठी ताकद आहे.

या वेळी बाजार समितीचे कांदा विभागाचे प्रमुख विनोद पाटील, माजी सरपंच मल्लिनाथ म्हेत्रे, ज्येष्ठ नेते दगडू राठोड, महेश पाटील, मंडळाचे विश्वस्त सज्जन पाटील, माजी सरपंच उमाकांत येरवडे, मंडळाचे अध्यक्ष वैभवराजे पाटील, उपाध्यक्ष सुशील पाटील, पोलिस पाटील चंद्रकांत चौगुले, स्वामीराव पाटील, गोविंद पाटील, विठ्ठल पाटील, गंगाधर होनपारखे, महादेव म्हमाणे, संदीप येरवडे, तुकाराम पाटील उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...