आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्यांग बालक सुविधांपासून वंचित:राज्यातील साडेतीन लाख दिव्यांग विद्यार्थी तीन वर्षांत सेवा-सुविधांपासून वंचित

उमेश कदम | सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

समग्र शिक्षा, समावेशित शिक्षणअंतर्गत दिव्यांग बालकांना इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत (वयाच्या १८ वर्षापर्यंत) नियमित विद्यार्थ्यांसोबत शिक्षणाची समान संधी देऊन मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी विविध सेवा सुविधा उपलब्ध करते. काेराेनाकाळात या विशेष गरजा असलेल्या विद्यार्थ्यांकडे विशेष लक्ष देण्याची गरज असताना, या घटकाकडे दुर्लक्ष झाले. आता कोरोना सरला असला, तरी गेल्या ३ वर्षांपासून राज्यभरातील साडेतीन लाख दिव्यांग विद्यार्थी शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या सर्व प्रकारच्या सेवा सुविधा आणि अनुदानापासून वंचित आहेत.

शिक्षण विभागातर्फे केंद्र सरकार ६० टक्के आणि राज्य शासन ४० टक्के याप्रमाणे मिळणाऱ्या अनुदानातून दिव्यांगांना त्यांच्या गरजेनुसार सेवा सुविधा दिल्या जातात. पण कोरोनापासून या निधीचा या वंचित घटकासाठी वापर झाल्याचे दिसत नाही. ‘कोरोनाकाळात शाळा बंद असल्याने सेवा देता आल्या नाहीत. पण या वर्षी दिव्यांगा विद्यार्थ्यांचा प्रस्ताव पाठवला आहे. त्यामुळे या वर्षी सर्व सुविधा मिळतील, असे प्रभारी शिक्षणाधिकारी संजय जावीरांनी म्हटले.

बातम्या आणखी आहेत...