आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज नामंजूर:दक्षिण मध्ये सरपंचपदाचे तीन; सदस्यपदाचे 18 अर्ज नामंजूर

दक्षिण सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

दक्षिण सोलापूर तालुक्यातील निवडणूक लागलेल्या १७ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी ११४ अर्ज मंजूर तर ३ अर्ज नामंजूर करण्यात आले. सदस्यांसाठीचे ६१८ अर्ज मंजूर तर १८ अर्ज नामंजूर करण्यात आले आहेत, अशी माहिती तहसीलदार अमोल कुंभार यांनी दिली.सदस्यांसाठी एकूण ६३६६ अर्ज प्राप्त झाले होते. सरपंच पदासाठी ११७ अर्ज आले होते. या पैकी ३ अर्ज नामंजूर करण्यात आले. त्यामध्ये दोन दर्गनहळ्ळी व एक अर्ज होनमुर्गीचा आहे.

सदस्यपदासाठी आहेरवाडी ६८ (१), बंकलगी ३४, दर्गनहळ्ळी १९ , गंगेवाडी १८ , आचेगाव ३५ (१), तोगराळी १५, धोत्री ३८ (१), रामपूर २५, मंद्रूप ९८ (२), विंचूर २९ (१), शंकरनगर २८ (२), कंदलगाव ६३ (३), वांगी २५ (१), निंबर्गी ४३ (१), औज (मंद्रूप) ४२ (१), होनमुर्गी १८ (२), बसवनगर २२ असे अर्ज मंजूर झाले. तर आहेरवाडी, आचेगाव, धोत्री, विंचूर, वांगी, निंबर्गी, औज प्रत्येकी १ अर्ज, तर मंद्रूप, शंकरनगर व होनमुर्गी प्रत्येकी २ आणि कंदलगावला ३ अर्ज बाद झाले.

बातम्या आणखी आहेत...