आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरातील एक चंदनाचे झाड व तीन इतर विविध प्रजातींची झाडे अज्ञात व्यक्तींनी तोडली. चंदनाच्या झाडाचा बुंधा तोडून त्यामधील सुवासिक गाभा चोरट्यांनी पळवला. शहराच्या मध्यवर्ती भागातील विश्रामगृहात चंदनाचे झाड तोडण्यात आल्याने विश्रामगृहाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
विश्रामगृहातील कक्ष एक समोरील चंदनाचे झाड पूर्णपणे छाटले होते. त्या सोबतच इतर तीन ते चार झाडे तोडण्यात आली आहेत. चंदनाच्या झाडाच्या फांद्या कचरा कुंड्यामध्ये पडल्याचे आढळून आले. वनविभाग, महापालिका उद्यान विभागाची परवानगी न घेताच झाडे तोडण्यात आली आहे.महापालिकेचे उद्यान अधीक्षक रोहित माने यांनी विश्रामगृहात जाऊन तोडलेल्या झाडांचा पंचनामा केला. झाडे तोडणे, फांद्या छाटण्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. घटनास्थळाचा पंचनामा केला असून वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
महापालिकेचे उद्यान अधीक्षक रोहित माने यांनी विश्रामगृहात जाऊन तोडलेल्या झाडांचा पंचनामा केला. झाडे तोडणे, फांद्या छाटण्यासाठी परवानगी घेण्यात आली नव्हती. घटनास्थळाचा पंचनामा केला असून वरिष्ठांकडे अहवाल सादर करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.वनपरिक्षेत्र अधिकारी दीपक खलाणे यांना विचारले असता, महापालिका क्षेत्रातील झाडं तोडण्याबाबत त्यांच्याकडील यंत्रणा परवानगी देते. पण, तोडलेल्या झाडांची वाहतूक करण्यासाठी वनविभाग परवानगी देते. शहरातून लाकूड वाहतुकीबाबत कोणीही परवानगी मागितली अथवा घेतलेली नाही.
विश्रामगृहाच्या परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविले आहेत. त्या कॅमेऱ्यांना झाडांच्या फांद्याच्या अडथळे होत असल्याने कर्मचाऱ्यांनी फांद्या तोडलेल्या आहेत. तोडलेल्या फांद्या त्याच परिसरात पडलेल्या आहेत. चंदन चोरीबाबतच्या अफवा असून कर्मचाऱ्यांनी जाणीवपूर्वक कोणतेही चुकीचे प्रकार केलेले नाहीत.
राजशेखर जेऊरकर, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.