आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चोरी:तीन टेम्पो आणि ५ दुचाकी जप्त, सांगोला पोलिसांची कारवाई

सांगोलाएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

शहर व ग्रामीण भागात ५ मोटार सायकली, ३ अशोक लेलँड टेम्पो, केबल वायर, इलेक्ट्रीक मोटार स्टील असा सुमारे २५ लाख रुपयांचा मुद्देमाल सांगोला पोलिसांनी जप्त केला आहे. अशी माहिती पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी यांनी दिली.याप्रकरणी गणेश भिमराव शिंदे रा. मस्के कॉलनी सांगोला, सचिन बाळासाहेब दिघे, स्वप्निल बापु ऐवळे दोघे रा. वासुद ता. सांगोला, बिरुदेव ऊर्फ बिऱ्या दादासाहेब ऐवळे रा. फॅबटेक कॉलेजच्या पाठीमागे पंढरपूर रोड सांगोला, खंडु नामदेव चव्हाण वय २२ वर्षे रा. मणेरी गल्ली सांगोला, महेश सुरेश वाघमारे वय २२ वर्षे रा. भोकरेवस्ती सांगोला, अतुल श्रीकांत चंदनशिवे रा. वासुद ता. सांगोला यांनी चोरीचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले.

या आरोपींना ताब्यात घेऊन सांगोला पोलिसानी चौकशी केली. त्यांच्यावर सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन टेंपोंसह केबल वायर, ३.५ टन स्टील, वेल्डींग मशीन, ग्रॅन्डर, कटर, पाणबुडी मोटार असा एकूण २५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसानी जप्त केला आहे. या टोळीतील आरोपींकडून सांगोला, आटपाडी व तासगाव परिसरातीलही काही गुन्हे उघडकीस आले आहेत. पोलीस अधिक्षक तेजस्वी सातपुते, अपर पोलीस अधिक्षक हिंमतराव जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अनंत कुलकर्णी, सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत हुले, सपोफौ कल्याण ढवणे, अस्लम काझी, सचिन वाघ, अनिल निंबाळकर, पोकॉ अमर पाटील, पैगंबर मुलाणी, गणेश झाडबुके सायबर पोलीस, अन्वर अत्तार यांच्या पथकाने ही कारवाई केली.

बातम्या आणखी आहेत...