आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानियोजन समितीच्या नावीन्यपूर्ण योजनेतून २०२१-२२ या वर्षात १० विविध योजनांवर १९ कोटी ४७ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा परिषदेच्या १०० शाळांना ४.५० कोटी रुपये खर्चून इंटरनेट लर्निंग सुविधा पुरविण्यात आली आहे. याशिवाय भूमी अभिलेख कार्यालयास मोजणीसाठी आधुनिक राेवर मशीन खरेदीसाठी ९६ लाख रुपयांचा निधी देण्यात आला आहे.
अकलूज स्मशाभूमीमध्ये शवदाहिनीसाठी ९९ लाख ७१ हजार, जिल्हा परिषद शाळांमध्ये दप्तर ठेवण्यासाठी प्लॉस्टिक मोल्डेड लॉकर पुरवठा करण्यात आला आहे. यासाठी १.९९ कोटी रुपयांचा निधी दिला आहे. जमीन मोजणीसाठी अत्याधुनिक ९ रोवर मशीन व संलग्न सामग्री खरेदीसाठी ९६ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. नगरपरिषदा, नगरपंचायत व पुनर्वसन, तहसील कार्यालय मंद्रूप येथे अभिलेख कक्षात कॉम्पॅक्टर बसविण्यासाठी २.५१ कोटीचा निधी उपलब्ध करून दिला आहे.१९.४७ कोटीपैकी कार्यालयीन कामकाजावर साडेपाच कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे, तर उर्वरित निधी लोकोपयोगी कामांवर खर्च करण्यात आला आहे.
विविध योजनांवर १९.४७ कोटी रुपयांचा निधी खर्च ग्रामीण भागात बेंद नाला खोलीकरण व रुंदीकरणासाठी ९९.९९ लाख रुपये, क्रीडा अधिकारी यांना कुस्ती व कबड्डी मॅट खरेदीसाठी ४.०४ कोटी, शासकीय कार्यालय, रुग्णालयात विद्युत संच बसविण्यासाठी १.३२ कोटी, पाणी निर्जंतूक करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागास १.८२ कोटी रुपयांचा निधी देण्यात आला आहे. जिल्हा कोषागार कार्यालयास निवृत्तीवेतन सुविधा केंद्राचे अद्ययावतीकरण व आधुनिकीकरण करण्यासाठी ३१.६० लाख निधी देण्यात आला आहे.
चालू आर्थिक वर्षासाठी प्रस्ताव जिल्हा नियोजन समिती मधून एकूण निधीच्या तीन टक्के निधी नाविन्यपूर्ण योजनांसाठी वापरला जातो. २०२२-२३ या आर्थिक वर्षात नाविन्यपूर्ण योजनेसाठी निधी उपलब्ध झाला असून जिल्हा प्रशासनाकडून प्रस्ताव मागवण्यात येत आहेत. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी डिसेंबर अखेरपर्यंत प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.