आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुवर्ण बाजार:गडगडले...चांदी 7 हजार, सोने 2300 रुपयांनी ; गाैरी-गणपतीच्या निमित्ताने  खरेदीला उधाण

साेलापूर / श्रीनिवास दासरीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ,

सोनेदरात २ हजार ३०० तर चांदीच्या दरात ७ हजार रुपयांनी घसरण झाली. उत्सव काळातच बाजारातील या घडामाेडींनी खरेदीची सुवर्णसंधीच चालून आली. गाैरी-गणपतीला आभूषणे घेण्याच्या निमित्तानेही खरेदीला उधाण आले आहे.अनंत चतुर्दशीनंतर लगेच पितृ पंधरवड्याला सुरुवात हाेईल. त्या पंधरा दिवसांच्या कालावधीत नवीन काही खरेदी हाेणार नाही. त्यानंतर साेने खरेदीचा मुहूर्त थेट ५ ऑक्टाेबरला दसऱ्याच्या दिवशीच आहे.

त्यामुळे ग्राहकांची पाऊले सुवर्णपेढ्यांकडे वळली. पूर्व मंगळवार पेठेतील सराफ बाजारासह माेठी दालने ग्राहकांनी फुलून गेली आहेत. गाैरींच्या स्वागताला साेन्याच्या दागिन्यांची खरेदी हाेऊ झाली. चांदीच्या वस्तूंनाही मागणी आली. यंदाच्या गाैरी-गणपतीच्या आरासमध्ये साेने-चांदीची आभूषणेही दिसून येतील. पक्ष पंधरवडा संपला की, साेन्याच्या दरात वाढ हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षी दसऱ्याच्या दिवशी ५५ हजार रुपये एक ताेळा (१० ग्रॅम) या दराने साेने विकले गेले. यंदा त्याहूनही पुढे जाण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्यामुळे गणेशाेत्सव काळातच साेने-चांदीची ही खरेदी सुरू झाली.

साेन्यातील गुंतवणूक ही साेन्यासारखीच असते
साेनेदराच्या घसरणीला आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या घडामाेडींचे कारण आहे. जसे- अमेरिकन फेडरल बँकेने व्याजदर वाढवण्याचे संकेत दिले. तैवान-चीन या दाेन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला. अशा गाेष्टींमुळे भांडवली बाजार आणि साेनेबाजारावर परिणाम हाेताे. साेन्याच्या दरात घसरण हाेते. या निमित्ताने साेने खरेदीची सुवर्णसंधी असते. साेन्यातील गुंतवणूक साेन्यासारखीच असते, कुठल्याही गरजेला लगेच आणि अधिक परतावा देणारी. खरेदी करताना ग्राहकांनी एवढेच लक्षात घ्यावे की, दागिन्यांपेक्षा बिस्किटांना अधिक प्राधान्य द्यावे. कारण बहुतांश दागिने २४ कॅरेटचे नसतात, काही दागिन्यांना हाॅलमार्किंग नसताे, जीएसटीसह बिलेही देत नाहीत. त्यामुळे सोन्याची बिस्किटे घ्यावीत.

बातम्या आणखी आहेत...