आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर प्रभाग रचना:जिल्हा परिषद, पंचायत समितीची उद्या जाहीर होणार प्रारूप प्रभाग रचना;  8 जूनपर्यंत मागवण्यात येणार सुचना-हरकती

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • तालुका तहसील,पंचायत समिती कार्यालयांमध्ये सकाळी होणार प्रसिद्धी

जिल्हा परिषद गट, पंचायत समिती गणाची प्रारूप प्रभाग रचना गुरुवारी (दि. 2) जिल्हा प्रशासनातर्फे जाहिर करण्यात येणार आहे. तालुकास्तरावर पंचायत समिती, तहसील कार्यालयांमध्ये गट व संबंधित तालुक्यातील गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रसिद्ध होणार आहे. जिल्हा परिषदेचे 77 गट, पंचायत समितीचे 154 गणांची प्रारूप प्रभाग रचना प्रशासनाने तयार केली आहे.

जिल्ह्यात पाच नवीन नगरपंचायत, नगरपरिषद तयार झाल्यामुळे जिल्हा परिषदेची गट रचना बदलली आहे. तसेच, जिल्हा परिषद सदस्य संख्या वाढवण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. त्यामुळे जिल्ह्यात नवीन सात गट, 14 गण वाढले आहेत. जिल्हा परिषदेच्या सदस्यांची संख्या 68 ऐवजी 77 झाली आहे. नवीन सात गट, 14 गणांमध्ये कोणत्या गावांचा समावेश झाला? जुन्या गट-गणातील कोणती गाव वगळली? कोणती गावं नव्याने जोडण्यात आली? याबाबत ग्रामीण भागातील लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे.

निवडणूक विभागाचे नियोजन

  • 2 ते 6 जून पर्यंत सुचना, हरकती मागणविण्यात येणार
  • 14 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालय येथे सकाळी 11 वाजता होणार सुनावणी

गुरुवारी (दि. 2) प्रारूप प्रभाग रचना जाहिर होईल. 8 जून पर्यंत त्यावरील हरकती, सुचना ग्रामपंचायत निवडणूक शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर कराव्यात. 14 जून रोजी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात त्यावर सुनावणी होणार आहे. -विठ्ठल उदमले, उपजिल्हाधिकारी, सोलापूर

बातम्या आणखी आहेत...