आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वारसा:आजची मुलेही दिसली सजग; इंटॅक इंडिया हेरिटेज क्विझ 2022

सोलापूर6 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आपला वारसा, संस्कृती याबद्दल आयोजित प्रश्नमंजूषा स्पर्धेत शहरातील २० शाळांतील विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. वारसा अन् संस्कृती स्थानिक, प्रादेशिक असो वा राष्ट्रीय, मुलांनी तत्परतेने उत्तरे दिली. पारितोषिकेही जिंकली. निमित्त होते इंटॅक इंडिया हेरिटेज क्विझ २०२२ स्पर्धेचे. ही स्पर्धा ह. दे. प्रशालेच्या मुळे सभागृहात घेण्यात आली.

शहरातील २० शाळांमधून ७ वी ते १० वीच्या ४० गटांनी या स्पर्धेत सहभाग घेतला. एका गटात दोन विद्यार्थी होते. दमाणी प्रशालेतील मधुरा तोळनूर, अथर्व मरगूर हा गट सर्वोत्तम ठरला तर आसावा प्रशालेचा वंदना खुने व कृष्णा पाटील यांचा गट दुसरा आला. बटरफ्लाय इंग्लिश मीडियम स्कूलचा प्रज्ञा पारवे व प्राची कमलापुरा हा गट तिसरा तर इंडियन मॉडेल स्कूल स्टेटचा तन्मय शेटे व दिव्येश मार्डीकर यांचा गट चौथा आला.

पहिला गट स्पर्धेच्या प्रादेशिक फेरीत सोलापूरचे प्रतिनिधित्व करेल. दोन फेऱ्यांच्या मधल्या वेळेत सर्व उपस्थितांना सोलापूरच्या सुंदरी वादनाची ओळख करून देण्यासाठी कलाश्री भीमण्णा जाधव व व्यंकटेशकुमार भीमाण्णा जाधव यांचे सुंदरी वादन झाले. या समारंभात ‘नेचर इन डेंजर’, गांधीजी @१५०’ तसेच ‘वारसा आपल्या हाती’ या पूर्वी घेतलेल्या स्पर्धांचे पारितोषिक वितरण मल्लेशप्पा कावळे, गोवर्धन चाटला, प्रा. नरेंद्र काटीकर, सविता दीपाली यांच्या हस्ते केले.

बातम्या आणखी आहेत...