आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादागिरी:टोल कर्मचाऱ्यांना पोलिसाने मारले; तलवारीने धमकावले ; बायोमॅट्रिक्स फोडले

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

विजापूर महामार्गावरील नांदणी नाक्यावर टोल मागितल्याने राज्य राखीव पोलिस दलातील पोलिसांसह सहा जणांनी मिळून टोल कर्मचाऱ्यांना मारहाण करून तोडफोड केल्याचा प्रकार घडला. या प्रकरणी सहा जणांविरुद्ध मंद्रूप पोलिसांत गुन्हा दाखल झाला.दरम्यान याची दखळ घेत पोलिसाला दलाचे कमांडंट विजयकुमार चव्हाण यांनी निलंबित केले. रोहन सुरेश जाधव (वय ३०), गजानन अण्णाराव कोळी (२९) (दोघे रा सैफुल, सोलापूर), सूरज बबनराव शिकारे (वय ३१) व पोलिस शिवशंकर बबनराव शिकारे (वय २५, रा. उद्धवनगर, सैफुल सोलापूर) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर इतर दोन इसमांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. नागेश भीमाशंकर स्वामी (वय २८) राहणार नांदणी (ता. दक्षिण सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे. स्वामी तसेच आनंद राठोड व महांतेश सोनकंटले कर्मचारी जखमी झाले.

चार जणांना पोलिस कोठडी : सहायक पोलिस निरीक्षक डॉ. नितीन थेटे, फौजदार अमितकुमार करपे व त्यांचे सहकारी घटनास्थळी दाखल झाले. तातडीने चारही संशयित आरोपींना अटक केली. तसेच या गुन्ह्यात वापरलेली गाडी व एक तलवार जप्त करण्यात आली आहे. सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली. आणखी दोन संशयित आरोपींची नावे निष्पन्न झाली असून त्यांनाही लवकर अटक करण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणाचा तपास करपे करत आहेत.

नेमके काय घडले? सहा संशयित आरोपी हे ३ जून रोजी रात्री जेवण करायला टाकळी येथील एका हॉटेलवर इनोव्हा (एम एच ०२ एक कयु ४४५५) मधून गेले होते. परत येताना रात्री साडेबाराच्या सुमारास टोल नाक्यावर कर्मचाऱ्यांनी टोलची मागणी केली. ‘मी पोलिस आहे, गाडी सोडा’, असे त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांनी नकार दिला. तेव्हा त्यांनी शिवीगाळ दमदाटी सुरू केली. गाडीतील इतर पाच जणांनी खाली उतरून मारहाण करू लागले. तेव्हा टोल नाक्यावरील कर्मचारी भांडण सोडवण्यास आले. त्यावेळी एकाने त्यांच्या गाडीतून तलवार बाहेर काढून धाक दाखवला. महांतेश सोनकंटले यास जखमी केले. इतर दोघांनाही मारहाण केली. कंट्रोल रूमचे काच दगडाने मारून फोडली. बायोमेट्रिक मशीनही फोडून अंदाजे २५ हजार रुपयांचे नुकसान केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...