आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गुन्हा दाखल:बँकेत बनावट सोने गहाण ठेवून कर्ज घेतले! दोन लाखांची फसवणूक, बीबी दारफळच्या तरुणावर गुन्हा दाखल

सोलापूर8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर कसबा परिसरातील आयसीआयसीआय बँकेत सात तोळे बनावट दागिने गहाण ठेवून कर्ज घेऊन दोन लाख ६ हजार रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे. समाधान विष्णू ननवरे (वय ४०, रा. बीबीदारफळ, ता. उत्तर सोलापूर ) असे बँकेची फसवणूक करणाऱ्याचे नाव आहे.

बँकेचे शाखाधिकारी श्रीकांत कोंडा यांनी १९ जून रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीनुसार १ सप्टेंबर २०२१ रोजी ननवरे याने ७ तोळे ४८ ग्रॅम सोन्याचे दागिने गहाण ठेवले. त्यापोटी मुद्दल आणि व्याज असे एकूण दोन लाख सहा हजार रुपये बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी तक्रार देण्यात आली आहे. समाधान हा शेती व्यवसाय करतो. बनावट दागिने गहाण ठेवून कर्ज घेतल्यामुळे त्याला अटक झाली आहे. सोमवारी त्याला न्यायालयात हजर केल्यानंतर दोन दिवस पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती पोलिस निरीक्षक विकास देशमुख यांनी दिली. बँकेत सोने तारण ठेवताना सोन्याची तपासणी करण्यात आली होती. पण, बँकेकडून झालेल्या ऑडिटमध्ये हा प्रकार समोर आला आहे. यामध्ये आणखी कुणाचा सहभाग आहे का, याबाबतची चौकशी सुरू आहे. प्राथमिक चौकशीनुसार ननवरे याला अटक झाली आहे. अजून तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...