आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मागणी:पंढरीत कॉरिडॉर विरोधात व्यापाऱ्यांचे आंदोलन; दुकानांवर लावले फलक

पंढरपूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

येथील प्रस्तावित कॉरिडॉरविरोधात श्री विठ्ठल मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकानांवर फलक लावून आंदोलन सुरू केले आहे. पुन्हा पुन्हा आमचीच घरे पाडू नका, परंपरागत तीर्थक्षेत्र पंढरपूर नष्ट करू नका, असे फलक लावून विरोध दर्शवला आहे.पंढरपूर शहरात तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील प्रस्तावित कॉरिडॉरला श्री विठ्ठल मंदिर परिसरातील रहिवासी नागरिक आणि व्यापाऱ्यांनी विरोध केला आहे. त्यासाठीच नुकताच पंढरपूर नगरपालिकेवर मोठा मोर्चा काढला होता. पालकमंत्र्यांना भेटून विरोध दर्शवला आहे. कॉरिडॉर रद्द करा, ही एकच मागणी व्यापारी आणि बाधित नागरिक करीत आहेत.

आंदोलनासाठी पंढरपूर तीर्थक्षेत्र बचाव समिती स्थापन केली आहे. या समितीच्या वतीने सध्या दररोज श्री विठ्ठलाच्या धूप आरतीच्या व वेळी मंदिर प्रदक्षिणा आंदोलन केले जात आहे. धुपारती सुरू झाल्यापासून परिसरातील नागरिक श्री विठ्ठल मंदिरास प्रदक्षिणा घालून कॉरिडॉर रद्द करण्याचे साकडे घालत आहेत.

त्याचबरोबर मंदिर परिसरातील सर्व व्यापाऱ्यांनी आपापल्या दुकानावर मोठ्या आकारात डिजिटल बॅनर लावून कॉरिडॉर रद्द करण्याच्या मुद्द्यावर लक्ष वेधले आहे. त्यावर विविध प्रकारचे संदेश लिहिले आहेत. तीर्थक्षेत्र भकास करू नका, कॉरिडॉर रद्द करा, आम्हाला परत एकवेळ विस्थापित करू नका, अशी मागणी या फलकांवरून केली जात आहे. श्री विठ्ठल दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे हे फलक लक्ष वेधून घेत आहेत. यामुळे पंढरपूर करांची मागणी राज्यभरात पोहोचेल, असा विश्वास व्यापारी व्यक्त करीत आहेत.

बातम्या आणखी आहेत...