आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मार्गदर्शन:सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी शेतीपूरक उद्याेगावर प्रशिक्षण

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत शेतकरी व सुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी शेतीपूरक उद्योगावर आधारित पाच दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. याची सुरुवात गुरुवारी करण्यात आली. सोमवार, दि १२ सप्टेंबरपर्यंत असेल. या पाच दिवसांच्या प्रशिक्षणामध्ये शेळीपालन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन व इतर शेतीपूरक उद्योगांवरील संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

शेळ्यांची निवड, आजार,उपचार व व्यवस्थापन, लसीकरण,चारा साठवण पध्दत, गोठा बांधणी, कोंबड्याची निवड, गिरीराज कोंबडी व कोंबड्यांच्या इतर जाती, आजार, लसीकरण, बाजारपेठ, व दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांची निवड, उत्पादन वाढीसाठी घ्यावयाची काळजी तसेच विमा, विक्री कौशल्य, प्रकल्प आहवाल, शासनाच्या विविध कर्ज योजना याविषयी तज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे. या प्रशिक्षणासाठी कमीत कमी ८ वी पास,तर वयोमर्यादा ५० वर्षे आहे. प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्यास प्रमाणपत्र मिळेल. अधिक माहितीसाठी मनीषा लोखंडे ९८९०५६०६७६ वर संपर्क साधवा. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त युवक-युवतींना लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी राजशेखर शिंदे यांनी केले आहे.

बातम्या आणखी आहेत...