आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापुरात सुमडीतील बदल्या रद्द:शिक्षकांना चिठ्ठीद्वारे दिल्या शाळा, मनपा शिक्षकांनी आक्षेप घेत आयुक्तांकडे केली होती तक्रार

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

मनपा शिक्षण मंडळाच्या शाळेतील ज्या शिक्षकांचे दहा वर्षे पुर्ण झाली आहे. अशा शिक्षकांच्या बदल्या करण्यात आलेल्या होत्या. मात्र त्या बदल्या चुकीच्या व मर्जीतील लोकांना चांगली व जवळची शाळा देण्याचा घाट घालण्यात आला होता.

ही गोष्ट मागासवर्गीय शिक्षक संघटनेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी त्यास विरोध करीत थेट आयुक्तांना झालेल्या बदल्याची खरी हकीकत सांगितली. त्यानुसार मंगळवारी सुमडीतील बदल्यांचा आदेश रद्द करीत शिक्षकांच्या उपस्थितीत मुलांच्या हातून चिठ्ठी काढून शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे सर्व शिक्षकांमध्ये आनंदी वातावरण होते.

तात्काळ कारवाई

पालिकेच्या एकुण 58 शाळा आहेत. त्यामध्ये साधारणपणे 211 शिक्षक कार्यरत आहेत. त्यामध्ये काही वर्षापासून बदल्या झालेल्या नव्हत्या. दिव्य मराठीच्या माध्यमातून बदलीचा प्रस्ताव प्रलंबित असे वृत्त प्रसिध्द केले होते. त्यानुसार मनपा शिक्षण मंडळाकडून तात्काळ कारवाई करीत. दहा वर्षाच्या पुढे एकाच शाळेत सेवा झालेल्या शिक्षकांचा निवडीचा निकष ठरवला होता. त्यानुसार मनपाच्या 41 शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या.

शिक्षक संघटनेच्या तक्रारीची दखल

पर्यवेक्षकाचा हस्तक्षेप वाढला. मर्जीतील लोकांना जवळची शाळा देण्याचे प्रकार दिसून आला. ही गोष्ट मनपा मागास वर्गीय शिक्षक संघटनेच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ बदल्या पारदर्शकपणे करण्याची मागणी आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे केली. शिक्षक संघटनेच्या तक्रारीची दखल घेत आयुक्तांनी शिक्षकांच्या उपस्थिती चिठ्ठी काढून बदली करण्याच्या सुचना उपायुक्तांना देण्यात आल्या.

मराठी माध्यमांचा शिक्षकांची बदली

प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या सोमवारी झालेल्या बदलीचा आदेश रद्द करत मनपा आयुक्तांनी विद्यार्थ्यांच्या हस्ते चिठ्ठी काढून बदली शाळा देण्याचे नियोजन केले. शहरातील मराठी माध्यम विभागातील 22 शिक्षक, उर्दू माध्यम 15 शिक्षक कन्नड 2 व तेलगू 2 अशा शिक्षकांच्या बदल्या केल्या आहेत. ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत. त्यांनी आदेशाप्रमाणे दिलेल्या बदलीच्या ठिकाणी तत्काळ रुजू व्हावे. तसा रिपोर्ट महापालिकेला सादर करण्यात यावा असेही सांगितले आहे.

आयुक्तांचे मानले आभार

शिक्षकांच्या बदल्या पारदर्शकपणे झाल्या पाहिजे अशी मागणी आयुक्तांकडे केली होती. त्या मागणीची दखल घेत आयुक्तांनी चिठ्ठी द्वारे व बदलीस पात्र असलेल्या शिक्षकांच्या उपस्थितीमध्ये ही प्रक्रिया पार पाडली. त्यामुळे शिक्षकांनी मिळालेली बदली आनंदाने स्विकारली. बदली प्रक्रिया व्यवस्थित पार पाडल्याने आयुक्तांचे आभार मानतो. अशी माहिती मनपा मागासवर्गीय शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी व सचिव अमोल भोसले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...