आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परिवहन:परिवहन : 3.50 कोटी आले निवृत्तांच्या देय रकमा देणार

सोलापूर3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोना काळात पोलिस प्रशासनाला मोफत सेवा दिल्यापोटी गृह विभागाकडून देणे असलेले साडेतीन कोटी रुपये महापालिका परिवहन विभागास प्राप्त झाले आहेत. त्यातून परिवहन सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना फंडाची रक्कम देण्यात येणार आहे. जे सेवकांनी पालिका कर भरला आहे त्यांना प्राधान्याने रक्कम देण्यात येणार असल्याची माहिती पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

परिवहनने दिलेल्या सेवेपोटी राज्याच्या गृह विभागाकडून साडेतीन कोटी रुपये येणे होेते. यासाठी महापालिका परिवहन विभागाकडून वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला. पालिका आयुक्त पी. शिवशंकर हे गृह विभागाचे सचिव लिमये यांना भेटले. साडेतीन कोटी रुपये शासनाने पालिकेस दिले. त्यातून परिवहनच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा फंड देण्यात येणार आहे. सर्व कर्मचाऱ्यांना पहिला टप्प्यातील रक्कम मिळेल. याशिवाय ज्या कर्मचाऱ्यांनी पालिकेचा कर भरला आहे, त्यांना प्राधान्याने रक्कम देण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिली.

ग्रामीण भागासाठी सेवा सुरू करा : संभाजी ब्रिगेड
ग्रामीण भागातून विद्यार्थी शहरात शिक्षणासाठी येत असून, त्यांच्यासाठी सिटीबस सेवा सुरू करावी, अशी मागणी संभाजी ब्रिगेडच्या श्याम कदम यांनी पालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना सोमवारी भेटून केली.

बातम्या आणखी आहेत...