आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्ज मागवले:परिवहनला अनुभवी व्यवस्थापक‎ मिळेना; पुन्हा काढली जाहिरात‎

साेलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

महापालिका परिवहन विभागास अनुभवी‎ परिवहन व्यवस्थापक मिळत नसल्याने दुसरी वेळ‎ जाहिरात काढण्याची नामुष्की महापालिकेवर आली‎ आहे. यापूर्वी भरतीसाठी जाहिरात काढली होती पण‎ अनुभवी उमेदवार मिळाला नाही. आता पुन्हा दुसऱ्यांदा‎ परिवहन व्यवस्थापक पदासाठी अर्ज मागवले आहेत.‎

अद्याप कोणी आले नाही. परिवहन व्यवस्थापक ईरण्णा‎ वन्यालोलू यांची मुदत संपल्यानंतर प्रभारी पदभार‎ श्रीशैल लिगाडे यांच्याकडे होता. त्यांच्यावर तत्कालीन‎ आयुक्त पी. शिवशंकर यांनी कारवाई केल्याने‎ व्यवस्थापक पद रिक्त आहे. यापूर्वी आलेल्या अर्जात‎ अनुभवाचा उल्लेख नव्हता, त्यामुळे नव्याने अर्ज‎ मागवल्याची माहिती उपायुक्त विद्या पोळ यांनी दिली.‎

बातम्या आणखी आहेत...