आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामाढा शहरामध्ये नव्याने सुरू झालेल्या मित्रप्रेम मल्टिस्पेशालिटी रुग्णालयात गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत इलाज व्हावा, यासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जात आहेत. गरजूंनी याचा लाभ घेण्याचे आवाहन हाॅस्पिटलचे संस्थापक अध्यक्ष दादासाहेब साठे यांनी पत्रकार परिषदेत केले.
या वेळी साठे म्हणाले, आजपर्यंत ५ नवजात शिशूंबरोबरच १२ रुग्णांवर मोफत यशस्वी शस्त्रक्रिया केल्या आहेत. महात्मा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत रुग्णांना शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार उपचार देण्यात येत आहेत. हृदयरोगामुळे तातडीचे उपचार आवश्यक असणाऱ्या सुमारे पंधरा रुग्णांचे प्राण या हाॅस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार मिळाल्याने वाचले आहेत. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. विकास मस्के यांनी मनोगत व्यक्त केले. ते म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजनेंतर्गत पिवळे व केशरी कार्डधारक रुग्णांवर किडनी, हाडांच्या आणि पोटविकाराच्या मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत. नवजात बालकांवरही मोफत शस्त्रक्रिया करण्यात येत आहेत.
ही योजना सुरू झाल्यापासून ५ नवजात शिशू व १२ रुग्णांवर किडनीचे तसेच हाडांच्या शस्त्रक्रिया केल्या आहेत. नगराध्यक्षा मीनल साठे, डॉ. स्नेहा मस्के, अजिनाथ माळी, चंद्रकांत कांबळे, धनाजी वसेकर, हणमंत राऊत, सुमन गाडेकर उपस्थित होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.