आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनोखा उपक्रम:मंगळवेढ्यात साजरा झाला झाडांचा वाढदिवस; सेंद्रीय खतापासून तयार केलेला कापला केक

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सोलापूर येथील मंगळवेढ्यात झाडांचा तिसरा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी आकर्षक फुलं, फुगे लावून सजवण्यात आलेली झाडे, रांगोळीच्या पायघड्या, सेंद्रिय खतापासून तयार केलेला केक कापून झाडांचा अनोखा वाढदिवस साजरा झाला.

अनोखा उपक्रम

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने सायंकाळी मंगळवेढा-पंढरपूर पालखी मार्गावर तीन वर्षांपूर्वी लावण्यात आलेल्या झाडांचा वाढदिवस अभिनव पद्धतीने साजरा करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती आणि वारी परिवाराने हा कार्यक्रम आयोजित केला होता.

वृद्धांच्या उपस्थितीत कापला केक

हरित वारी पालखी महामार्गाचे संकल्पक हभप शिवाजी महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. अबाल वृद्धांच्या उपस्थितीत सेंद्रीय खतापासून तयार केलेला केक कापला. झाडांच्या बुंध्यापाशी केक रुपी खत टाकून पाणी घालण्यात आले.उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करीत, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे, पक्षीही सुस्वरे आळविती.. हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचे अभंग म्हटला.

वारी परिवाराने सुरु केलेली संकल्पना

श्री. मोरे महाराज म्हणाले की, वृक्ष जगले तरच मानव जात जिवंत राहणार आहे. झाडांचा वाढदिवस साजरा करण्याची मंगळवेढयातुन वारी परिवाराने सुरु केलेली संकल्पना संपूर्ण महाराष्ट्रात सुरू झाली पाहिजे. प्रत्येक झाड मानवाला ऑक्सिजन देते. झाडे नष्ट झाली तर पुढे मानवाला ऑक्सिजन मिळणार नाही परिणामी मानव जगू शकणार नाही, त्यामुळे आपला वाढदिवस होऊ शकणार नाही. म्हणूनच स्वतःचा वाढदिवस साजरा करायचा असेल तर त्यासाठी वृक्ष लागवड व संवर्धन हाच एकमेव पर्याय असून झाडांचा वाढदिवस साजरा करण्याचा एक वेगळा आदर्शवत आहे.

यावेळी अजित जगताप, शशिकांत चव्हाण मोहनराव जोंधळे , माणिक गुंगे, विठ्ठल बिले, परमेश्वर पाटील, सत्यजित सुरवसे, रतिलाल दत्तू, अरुण गुंगे, आकाश सुरवसे, स्वप्नील टेकाळे, सुदर्शन ढगे मनीष लेंडवे सुरेश माळी संग्राम दुधाळ जयराज शेंबडे, प्रशांत काटे, अजय आदाटे, पांडुरंग कौंडुभैरी, अमर जाधव रवी जाधव, चालक- मालक मोटर संघटना सर्व सदस्य वारी परिवाराचे सर्व सदस्य उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...