आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामालट्रकने धडक दिल्याने योगेश माणिक जानराव (वय २८, रा. नान्नज, ता. उत्तर सोलापूर) हा युवक गंभीर जखमी झाला. जानराव हा मोटारसायकलवरून (एमएच १३ सीए ८५४९) नवीन कपडे घेण्यासाठी निघाला होता.
त्यावेळी बाळे येथे मालट्रक एमएच १३ एएक्स ४४६४ याच्या चालकाने धडक दिल्याने उजवा हात, पायास व कमरेच्या खालच्या मणक्यास गंभीर दुखापत झाली आहे. फौजदार चावडी पोलिस स्टेशनमध्ये या घटनेची नोंद झाली असून पोलिस नाईक कसबे पुढील तपास करीत आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.