आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा‘इतिहासपटांत खऱ्या इतिहासाची तोडमोड होऊ नये, विकृतीकरण हाेऊ नये. खरा इतिहास हा प्रेरणा देणारा असताे. प्रत्येकाने आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पाळणे गरजेचे आहे’, असे मत प्रसिद्ध सिनेअभिनेते सयाजी शिंदे यांनी सोमवारी येथे व्यक्त केले.मराठी चित्रपट ‘पाहिजे जातीचे’च्या चित्रीकरणाचा मुहूर्त गुजराती भवन येथे दुपारी पार पाडला. याप्रसंगी ते माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे दिली.
महाराष्ट्रातील राजकारणाविषयी चित्रपट करत आहात का किंवा राजकारणाकडे आपण कसे पाहता या प्रश्नावर ते म्हणाले, राजकारण हे साेयीचे असते. सर्वांत महत्त्वाची भूमिका असते ती म्हणजे मतदारांची. निवडणुकीच्या काळात सर्व पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते मतदारांच्या घरात पैसे घेऊन जातात. दारू आणि मटणाच्या पार्ट्या देतात, असे मी ऐकले आहे. हा प्रकार शक्यताे होऊ नये. त्यासाठी सर्व प्रथम आपण आपल्या घरातून चांगली सुरुवात करणे आवश्यक आहे. सध्या दाक्षिणात्य चित्रपटाची चलती आहे या प्रश्नावर ते म्हणाले, ‘असे काही नाही, कोणी कमी कोणी जास्त नाही. प्रत्येकाची एक चांगली वेळ असते.’याप्रसंगी निर्माते डॉ. मल्लिकार्जुन गजरे, दिग्दर्शक कबड्डी नरेंद्र बाबू यांच्यासह कलाकार उपस्थित हाेते. या चित्रपटात सर्वाधिक कलाकार सोलापूर येथील आहेत. याचे पुढील चित्रीकरण गुलबर्गा येथे होणार आहे.
तेंडुलकरांच्या नाटकावर आधारित चित्रपट
‘सयाजी शिंदे म्हणाले की, हा चित्रपट जातीयतेवर नसून जातीचा कलावंत पाहिजे असे आपण म्हणताे त्या प्रमाणे आहे. गजरे फिल्म निर्मित विजय तेंडुलकर यांच्या ‘पाहिजे जातीचे’ या नाटकावर आधारित हा चित्रपट तयार केला जात आहे. मी हे नाटक अनेकवेळा पाहिले आहे. या नाटकात नाना पाटेकर यांनी भूमिका केली होती. हे खूपच उत्तम नाटक असून तेवढ्याच ताकदीचा चित्रपट तयार होईल.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.