आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुकाराम मुंडे सोलापुरात लवकरच येणार:11 वैद्यकीय अधिकार्‍यांची राजीनामे, कारण मात्र व्यक्तीगत दिले, आरोग्य सेवेसाठी पर्यायी व्यवस्था

सोलापूर24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

आरोग्य विभागाचे राज्य आयुक्त तुकाराम मुंडे यांनी आरोग्य विभागाचा पदभार स्विकारला. तुकाराम मुंडे लवकरच सोलापूर जिल्ह्याच्या दौर्‍यावर येत असून, आरोग्य विभागातील गैरकारभाराचा पोस्टमार्टम करण्याची शक्यता आहे. त्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील 3 वैद्यकीय अधिकारी व 8 बंद पत्रित वैद्यकीय अधिकारी असे 11 वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजानामे दिले आहेत.

येत्या काळात वैद्यकीय अधिकार्‍याच्या कमतरतेमुळे सोलापूर जिल्हा ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सलाईन वर राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. राजीनामा दिलेल्या अकरा वैद्यकीय अधिकार्‍यात तीन वैद्यकीय अधिकारी हे कायमसेवेतील तर आठ वैद्यकीय अधिकारी हे बंद पत्रित आहेत.

आरोग्य आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांनी पदभार घेतल्यापासून सोलापूर जिल्हा परिषदेकडे कार्यरत असणार्‍या वैद्यकीय अधिकार्‍यांचा राजीनामा देण्याकडे कल वाढला आहे . राजीनाम्याचा सुरु असणारा प्रकार म्हणजे तुकाराम मुंढे यांच्या शिस्तीचा धसका असल्याचेही बोलले जात आहे. सोलापूर जिल्ह्यात 78 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 578 उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्र, उपकेंद्रे व ग्रामीण भागातील लोकसंख्या लक्षात घेता जिल्ह्यात वैद्यकीय अधिकार्‍यांचा वानवा असताना वैद्यकीय अधिकार्‍यांच्या राजीनामाचे सत्र सुरू झाले आहे.

बंदपत्रीत वैधकीय अधिकार्यांनी पदवीधर अभ्यासक्रम प्रवेश परीक्षेसाठी अभ्यासाला वेळ मिळावा यासाठी राजीनामा दिल्याचे स्पष्टीकरण राजीनामा पत्रात दिले आहे. तर कायमसेवेत असणार्या वैधकीय अधिकार्यांनी राजीनामा देण्याचे नेमके कारण राजीनामा पत्रात नमुद केलेले नाही .

150 वैद्यकीय अधिकाऱ्यांवर धुरा

सोलापूर जिल्ह्यात 78 प्राथमिक आरोग्य केंद्र तर 578 उपकेंद्र आहेत. आरोग्य केंद्रात व उपकेंद्रात एकूण 161 वैद्यकीय अधिकारी कार्यरत होते. यापैकी 96 वैद्यकीय अधिकारी हे कायम, 35 वैद्यकीय अधिकारी हे बंदपत्रित आहेत. तर 30 कंत्राटी वैद्यकीय अधिकार्‍यांचा यात समावेश आहे. वैद्यकीय अधिकार्‍यांचा समावेश आहे यापैकी कायम कायम असणार्‍या 96 वैद्यकीय अधिकार्‍यापैकी तीन वैद्यकीय अधिकार्‍यांनी तर बंदपत्रीत 35 वैद्यकीय अधिकार्‍यांपैकी आठ वैद्यकीय अधिकार्‍यांनी राजीनामा दिला आहे. आता केवळ 150 वैधकीय अधिकार्यावर संपूर्ण ग्रामिण जनतेच्या आरोग्याची जबाबदारी आहे.

''राजीनामा दिलेल्या अकरा वैद्यकीय अधिकार्‍यात तीन वैद्यकीय अधिकारी हे कायमसेवेतील तर आठ वैद्यकीय अधिकारी हे बंद पत्रित आहेत. व्यक्तीगत कारणांमुळे राजीनामा दिल्याचे कारण संबंधितांनी दिले आहेत. आरोग्य सेवेवर परिणाम होऊ नये यासाठी पर्यायी व्यवस्था आहे.'' - डॉ.शीतलकुमार जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सोलापूर

बातम्या आणखी आहेत...