आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी मंगळवारी अकलूजमध्ये दाखल झाली. अकलूजमध्ये पालखी दाखल होताच, पालखीचे तिसरे रिंगण पार पडले.
रिंगणाचे पूजन मान असलेल्या मोहिते पाटील यांच्या हस्ते पार पडले. यावेळी भक्तांनी विविध खेळात दंग झालेल्या वैष्णवांमुळे रिंगणात रंग भरला होता. वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्याने मोठा उत्साहात हा रिंगण सोहायला पहायला मिळाला. जवळपास दोन वर्षानंतर हा रिंगण सोहळा पार पडल्यांने भाविकांनी जिल्हाभरातून यासाठी गर्दी केली होती.
तत्पूर्वी, संत तुकाराम महाराज पालखी दोन वर्षाच्या खंडानंतर वारीसाठी पुणे जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. निरा नदी पुल पार करुन आल्यावर सोलापूर जिल्ह्यात पालखीचे स्वागत करण्यात आले. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलिस अधिक्षक तेजस्विनी सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी पालखीचे स्वागत केले.
तुकाराम महाराज पादुकास पुष्पहार अर्पण करुन दर्शन घेतले. संत तुकाराम महाराजांच्या जयघोषात हजारो वारकऱ्यांच्या उपस्थित पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केल्याने पुढील आठ दिवस जिल्हयात भक्तीचा गजर होणार आहे. सराटी पासून काही अंतर जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद सीईओ पालखीत बसून स्वारथ्य केले.
पुणे जिल्ह्यातून हजारो वारकरी सोमवार पासून सोलापूर जिल्हयात प्रवेश करत होते. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास संत तुकाराम पालखी सोलापूर जिल्ह्यात प्रवेश केला. जिल्ह्याच्या सीमेवर जिल्हाधिकारी शंभरकर,पोलिस अधिक्षक सातपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी यांनी पुष्पहार अर्पण करुन पालखीचे स्वागत केले. पालखीच्या आग्रभागी चौघडा, दोन अश्व होते. त्यानंतर क्रमानुसार दिंड्या होत्या. दिंड्याच्य आग्रभागी झेंडेकरी, टाळकरीनंतर पालखी असा क्रम होता. स्वागतस्थळी जिल्हा परिषदेच्या वतीने जनजागृती मंच उभारण्यात आले. शाहीर माने यांनी शासनाच्या विविध योजना, आरोग्य विषयक काळजी घेण्याचे गीत सादर करत होते.
वारी मार्गावर सेवेकरी
अकलुज येथील वारी मार्गावर वारकऱ्यांची सेवा करण्यासाठी सेवेकरी होते. त्यात दाढी, कटींग, बॅग शिवून देणे, चप्पल दुरुस्ती, आरोग्य तपासणी, नेत्र तपासणी आदी सेवा सेवेकरी मोफत करत होते.
साहित्याचे वाटप
वारकरी पंधरा दिवसापासून वारी करत असल्याने त्यांच्यासाठी सकाळी वारी मार्गावर खाद्य पदार्थ वाटप सुरु होते. चहा, शरबद, नाष्टा, फळ वाटप करण्यात येत होते. डाॅक्टरांनी मोफत आरोग्य तपासणी करुन आवश्यक असेल तर प्राथमिक तपासणी करुन औषध देत होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.