आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:मुस्लिम कुटुंबाने लावले तुळशीचे लग्न, सोलापुरात मुस्लिम कुटुंबात साजरे होतात दसरा, दिवाळी सण

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • तुळशीचे लग्न आनंद देणारा सण

कोणी कोणता सण साजरा करावा या बंधनाच्या कुंपणात नाही तर आनंदात जगणाऱ्या सोलापुरात परवीन मुल्ला यांनी आपल्या अंगणात शास्त्रशुद्ध पद्धतीने रंगरंगोटी करून तुळशीचे लग्न लावले. श्रद्धेला मोल नाही. ती कुठेही अन् कुणाच्याही मनात असू शकते, हेच त्यांनी दाखवून दिले. गेल्या तीन वर्षांपासून परवीन आणि त्यांचे कुटुंबीय तुळशीचा विवाह अतिशय दिमाखात साजरा करतात. तसाच तो यंदाही त्यांनी आपल्या कुटुंबीयांसमवेत साजरा केला आहे.

पती गेल्यानंतर परवीन आपा यांनी कुटुंबप्रमुख म्हणून भूमिका साकारली. पदर खोचून शेती व्यवसायाकडे वळल्या. पन्नास वर्षांच्या परवीन यांना दोन मुले, सुना व नातवंडे आहेत. हिंदू बांधवांचा प्रत्येक क्षण हा उत्साहपूर्ण असतो आणि तो आपल्याला खूप आवडतो असे त्या सांगतात. मी दसरा-दिवाळी, गणेशोत्सव हे सर्वच सण अतिशय आनंदाने साजरे करते. त्यात सगळ्यात आवडता सण म्हणजे दिवाळी. दिवाळीच्या प्रत्येक दिवसाचा आनंद लुटतो. हिंदू बांधव घरात फराळ तयार करतात तसा परवीन यांच्या घरीही फराळ तयार करतात. रामलाल चौकातील शेजारीही मनमिळावू आहे. ते सर्वजण मिळून एकत्र सण साजरे करतात. भेदभाव जवळपासही फिरकत नाही.

तुळशीचे लग्न आनंद देणारा सण
मुळात दिवाळी हा सण प्रचंड आनंद देणारा आहे. त्यानंतर आपल्या घरात दरवर्षी लग्नाचं कार्य घडवणारा तुलसी विवाह आम्हा कुटुंबीयांना फार आवडतो. त्यामुळे ही परंपरा आम्ही मोठ्या उत्साहाने साजरी करतो. याबरोबर दसरा-दिवाळी गणेशोत्सव सर्वच सण आम्ही हिंदू बांधव साजरे करतात तसे साजरे करतो. परवीन मुल्ला, शेतकरी

Open Divya Marathi in...
  • Divya Marathi App
  • BrowserBrowser