आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विशेष:अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा, स्नान, पूजेनंतर सुवासिनींनी लावली देवाला हळद

वेळापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

वेळापूर (ता. माळशिरस) येथील ग्रामदैवत श्री अर्धनारी नटेश्वराचा हळदी सोहळा बुधवारी भाविकांच्या उपस्थितीत झाला. गुढीपाडवा दि.२ एप्रिलला यात्रेची सुरुवात झाली आहे. शनिवारी दुपारी चार वाजता यात्रेतील धार्मिक विधींना सुरुवात झाली आहे. बुधवारी अर्धनारी नटेश्वरास आधी गरम पाण्याने व नंतर थंड पाण्याने स्नान घालण्यात आले. त्यानंतर गजानन वसेकर परिवाराने मानाचा पोषाख आणून दिला. तो देवाला परिधान करण्यात आला. साधू नामदेव पिसे यांनी फुलांची आकर्षक सजावट केली होती. गुरव कुटुंबीयांनी धार्मिक विधी पार पाडला. मोहन पालकर यांनी बांगड्या भरल्या. श्रीकांत होडगे, अनुराधा होडगे, राधिका श्रीकांत होडगे, दिशा मयूर होडगे यांनी सुवासिनींची ओटी भरली.

विधिवत पूजेनंतर महिलांनी अर्धनारी नटेश्वराला हळद लावली. यावेळी यात्रा समितीचे अध्यक्ष सुखदेव आडत, उपाध्यक्ष लखन मंडले, सचिव जीवन वाघे, काशिनाथ आडत, निवृत्ती भुसारे, शिवाजी सावंत, नागेश क्षीरसागर, शंकर आडत, विश्वास वाघे, शिवाजी मोहिते उपस्थित होते.

यांनी लावली देवाला हळद : देवस्थानचे पुजारी गुरव कुटुंबातील पाच महिलांसह सरपंच विमल जानकर, वसेकर कुटुंबीय, राधिका डोडगे, दिशा होडगे यांनी देवाला तेल, हळद लावली. त्यानंतर देवाला मानाचा पोशाख परिधान करून आरती करण्यात आली. सायंकाळी माळी समाजाने महाप्रसादाचे वाटप केले. पुजारी गौरीहर गुरव, सतीश गुरव, रविराज गुरव यांनी पौराहित्य केले.

बातम्या आणखी आहेत...