आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खेळाचे वाढीव गुण:बारावीत सवलतीच्या गुणांसाठी अकरावी किंवा बारावीच्या क्रीडा कामगिरीचा विचार करणार

सोलापूर2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ज्या खेळाडू विद्यार्थ्यांनी सवलतीच्या वाढीव गुणाचा लाभ दहावीत असताना घेतला, त्याचा बारावीत लाभ घेण्यासाठी अकरावी किंवा अकरावीची क्रीडा कामगिरी विचारात घेतली जाईल, असा खुलासा क्रीडा व युवक सेवा खात्याचे आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांनी केला आहे.दहावी आणि बारावीतील खेळाडू विद्यार्थी सवलतीचे वाढीव गुण मिळण्यास पात्र करण्यासाठी राज्यातील सर्व जिल्हा क्रीडा अधिकारी याना त्यांनी मार्गदर्शक सूचना पाठविल्या आहेत.

इयत्ता १० वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता ६ वी ते १० वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळवले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ वी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ७ वी अथवा ८ वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता ७ वी ते १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळवले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षात क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.

इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता ६ वी ते १२ वी मध्ये कोणत्याही वर्षात शिकताना क्रीडागुणासाठी पात्र असणारे प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडू क्रीडागुण सवलतीसाठी पात्र आहे. तथापी संबंधित खेळाडूस इयत्ता ६ ते ८ यी इयत्तेत शिकत असताना मिळविलेल्या प्राविण्याचा लाभ देण्यासाठी तो इयत्ता ९ वी अथवा १० वी मध्ये शिकत असलेल्या वर्षात आयोजित स्पर्धात किमान सहभागी होणे आवश्यक आहे. तसेच इयत्ता ९ वी ते १२ वीमध्ये शिकत असलेल्या वर्षात प्राविण्य मिळविले असल्यास सदर खेळाडूस शिकत असलेल्या वर्षातील सहभागाची अट लागू राहणार नाही.

इयत्ता १२ वी परिक्षेस प्रविष्ठ असलेल्या खेळाडू विद्यार्थ्याने इयत्ता १० वी मध्ये क्रीडागुणांची सवलत घेतली असल्यास अशा खेळाडू विद्यार्थ्यांना इयत्ता ६ ते १० वी मध्ये शिकत असताना मिळविलेल्या क्रीडाप्राविण्यास इयत्ता १२ वी करीता क्रीडागुणांची सवलत देय असणार नाही. अशा खेळाडू विद्यार्थ्यांकडे इयत्ता ११ वी अथवा १२ वी मध्ये शिकत असताना मिळविलेली क्रीडागुण मिळण्यासाठीची पात्र क्रीडा कामगिरी असणे आवश्यक आहे. अशा खेळाडू विद्यार्थ्यांना शिकत असलेल्या वर्षातील क्रीडा स्पर्धातील सहभागाची अट लागू राहणार नाही.

बातम्या आणखी आहेत...