आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जुळ्या बहिणींशी लग्न भोवणार:नवरदेवाच्या पहिल्या पत्नीकडून तिसरी बायको केल्याची तक्रार; महिला आयोगातही धाव

सोलापूर । मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात गेल्या काही दिवसांपासून एका लग्नाची जोरदार चर्चा सुरू आहे. ते म्हणजे एका तरुणाशी उच्चशिक्षित जुळ्या बहिणींनी एकच मांडवात लग्न केले. या प्रकरणात आता नवीनच टविस्ट आला आहे. नवरदेवाच्या पहिल्या बायकोने त्याच्याविरोधात महिला आयोगात धाव घेत तक्रार दाखल केली आहे.

नेमके प्रकरण काय?

अकलूज (माळेवाडी) येथे शुक्रवारी (दि. 2) एका युवकाने जुळ्या बहिणींबरोबर विवाह केला. या संदर्भात त्या युवकावर अकलूज पोलिस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल केला. राहुल फुले यांच्या तक्रार दिली आहे. अंधेरीच्या युवकाने कांदिवली येथील दोघींसोबत एकाच वेळी माळेवाडी येथील हॉटेलमध्ये विवाह केला. माळेवाडी येथील राहुल फुले यांनी अकलूज ठाण्यात तक्रार दिल्यानंतर नवरा मुलावर अदखलपात्र गुन्हा दाखल झाला.

पहिला पत्नीकडून तक्रार दाखल

यानंतर आता या प्रकरणामध्ये त्या तरुणाचे आधीच लग्न झाल्याची माहिती समारे आली आहे. तरुणाच्या पहिल्या बायकोने नवरदेवाच्या विरोधात तक्रार दाखल केली असून महिला आयोगाकडे धाव घेतली आहे. जुळ्या बहिणींशी केलेले लग्न पहिल्या पत्नीला मान्य नाही असे सांगताना तिने पोलिस ठाण्यात अतुल विरुद्ध तक्रार दिली आहे.

जुळ्या बहिणी म्हणतात?

संगनमताने विवाह केला आहे. त्या दोघीही उच्चशिक्षित असून, आयटी कंपनीत नोकरीस आहेत. त्यांच्या कोणत्याही नातेवाइकांची यासंदर्भात कसलीही तक्रार नाही. पहिली बायको असताना तिच्या संमतीविना दुसरे लग्न केल्यास कारवाई होते. परंतु येथे या दोन्ही बहिणींची संमती असल्याचे सांगण्यात आले. राहुल फुले यांच्या तक्रारीवरून अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे, असे अकलूजचे पोलिस निरीक्षक अरुण सुगावकर यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...