आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजुळ्या मुलांचे स्वभावामध्ये साधर्म्य असते, असे म्हटले जाते. नुकत्याच जाहीर झालेल्या दहावीच्या परीक्षेत सृष्टी व वरुण माने या जुळ्या भावंडांच्या गुणांची बेरीज एकदम ‘सेम टू सेम’ आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, दोघेही जुळे सोलापुरातील मेहता प्रशालांमध्ये शिकले. जुळ्यांच्या चेहऱ्याबरोबर स्वभावही सारखे असतात. त्यातून अनेक रंजक घटनादेखील घडतात. मजेरवाडी येथील भोपळे नगरमध्ये वर्षा व प्रभाकर माने दाम्पत्य राहते. माने दाम्पत्य अक्कलकोट तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत. त्यांना वरुण व सृष्टी अशी जुळे-पाल्य आहेत.
पहिलीपासून दोन्ही जुळे भावंडे एकाच शाळेमध्ये शिकतात. आत्तापर्यंत दोघांच्या शाळेच्या मार्क लिस्टमध्ये एक-दोन टक्केचा फरक असायचा. पण, दहावीमध्ये दोघांच्या गुणांची बेरीज एक समान आहे, अशी दुर्मिळ घटना पहिल्यांदाच सोलापूरात घडल्याची चर्चा आहे. जुळ्या मुला-मुलींच्या बाबतीत अशाप्रकारे मार्कही जुळेच असल्याने हा चर्चेचा विषय ठरला आहे. वरुण व सृष्टीचा जन्मदिवस 30 डिसेंबर 2006 दोघेही अभ्यासात हुशार, अर्थात ते जुळे भावंडं असले तरी एक मुलगा आणि एक मुलगी असल्याने त्यांच्या आवडी-निवडी वेगवेगळ्या आहेत.
मैदानी खेळाची विशेष आवड
खाणे-पिणे, मनोरंजन, अभ्यास हे सर्वच वेगळे आहे. अभ्यासतही वरुणला गणित विषय आवडतो. तर, सृष्टीला व वरुण या दोघांना गणित व विज्ञान आवडीचे विषय आहेत. दोघांना 500 पैकी 445 गुण असून त्यांची टक्केवारी 89 आहे. जुळे भावंडांची वेगवेगळ्या विषयांमध्ये रुची आहे. वरुणचा अभियांत्रिकी क्षेत्राकडे करिअरकडे ओढा असून मैदानी खेळाची विशेष आवड आहे. तर, सृष्टीला पाककला, संगणक अभियांत्रिकीची आवड आहे. ‘सायबर सिक्युरीटी’ या क्षेत्रात करीअर करण्याची इच्छा सृष्टीची आहे. प्राथमिक शाळेपासून दोघांमध्ये त्यांच्या एक-दोन मार्कांनी कायम स्पर्धा असायची. जुळे बहिण-भाऊ असल्याने चेहरेपट्टी एकसमान साधर्म्य नाही. दोघांच्याआवडीनिवडी खूप वेगळ्या आहे. दहावीच्या परीक्षेत मात्र दोघांना एकसमान 89 टक्के गुण मिळाले, हा एक योगायोग आहे. आमच्या दोन्ही पाल्यांनी चांगले गुण मिळवले, याचा सार्थ अभिमान आहे, असे पालक वर्षा माने यांनी म्हटले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.