आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

न्यायालयीन:नरेशच्या खूनप्रकरणी दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी

सोलापूर4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नरेश नागेश चिंता (वय २४, नवीन विडी घरकुल, कुंभारी) याच्या खूनप्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी मिळाली आहे.

राहुल यल्लाप्पा पुरूड (२२, रा. नवीन विडी घरकुल, कुंभारी), अनिल दत्‍तात्रेय राडम (नवीन विडी घरकुल, कुंभारी) यांना अटक झाली होती. त्यांची पोलिस कोठडी संपल्यामुळे सोमवारी अक्कलकोट न्यायालयात हजर केल होते. राहुलची दुचाकी एका व्यक्तीकडे गहाण होती. ती दुचाकी नरेश आणि अनिल यांनी परस्पर हैदराबादला पंधरा दिवसांपूर्वी नेली होती. नरेश हैदराबादमध्ये भावाकडे राहिला होता. अनिल दुचाकी घेऊन सोलापुरात आला. २९ मार्च रोजी पुन्हा नरेश हा हैदराबादहून सोलापूरला आला होता. दोघा आरोपींनी मिळून त्याच्या डोक्यात मारून खून करून जवळच्याच विहिरीत मृतदेह टाकला. दोन दिवसांनी खुनाचा हा प्रकार समोर आला होता. गुन्ह्यातील रिक्षा जप्त करण्यात आली आहे. अजून या घटनेचा तपास सुरू आहे दोघा आरोपींना न्यायालयीन कोठडी मिळाल्याची माहिती वळसंगचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...