आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरात यापूर्वी सोडीयम व्हेपरचे दिवे होते. त्याचे देखभाल व दुरुस्ती करणे जिकरीचे होत असल्याने शहरासाठी ईईएसएल कंपनीकडे महापालिकेने पथदिव्यांचा मक्ता दिला. त्यानंतर शहरात दरमहा २३०० मे २८०० तक्रारी महापालिकेकडे येत आहेत.
त्याचे निराकरण केल्याचा अहवाल येत असून, त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी महापालिकेकडे असलेले विद्युत अभियंता पाहणी न करता झोन अधिकाऱ्यांची स्वाक्षरी घेऊन वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्यात येते. दरमहा इतक्या माेठ्या प्रमाणात दुरुस्ती हाेत असताना त्याची खातरजमा केली जात नाही. त्यामुळे दुरूस्तीबाबत शंका आहे.
शहरात बहुतेक ठिकाणी अंधार होता. ते कमी करण्यासाठी पालिकेच माजी आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांच्या कार्यकाळात ईईएसएल कंपनीस मक्ता दिला. याबाबत पालिका सभागृहात गोंधळ होत असल्याने सुरत येथे त्या कंपनीने केलेल्या कामाची पाहणी करण्यासाठी नगरसेवकांना पाठवले. त्यानंतर मक्ता मंजूर करण्यात आला. शहरात सुमारे ६० हजार पथदिवे बसवण्याचा उद्दिष्ट असून, ५४ हजार पथदिवे बसवले आहेत. यापूर्वी ते ३४ हजार इतके होेते. जुने काढून नवीन बसवले. पथदिवे दुरुस्तीसाठी पालिकेकडे दरमहा २३०० ते २८०० तक्ररी पालिकेकडे प्राप्त हाेतात. त्यांचे निराकरण केले जाते. एका झोनमध्ये सुमारे ३०० ते ४०० तक्रारी असतात, रोज सरासरी १० तक्रारी प्राप्त होत असून, त्याचे निराकरण केले जाते.
पथदिवे दुरुस्ती करतात काळजी घेतले जात नाही, यातून झोन क्रमांक ४ मध्ये एका लहान मुलीचा बळी गेला. यापूर्वी त्याच झोनमध्ये दोन गाढवाचा प्राण गेला. मुक्या जनावरांचा प्राण गेला. निष्काळजीपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी झोन कार्यालयात असलेले विद्युत अभियंता यांची नेमणुक असताना त्यांनी प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी न जाता फक्त रिपोर्ट तयार करतात. या रिपोर्टवर झोन क्रमांक ४ चे अधिकाऱ्यांनी शंका उपस्थित करत वरिष्ठ कार्यालयास अहवाल पाठवला. त्यावर काहीच कारवाई झाली नाही त्यामुळे विद्युत अभियंता बिनधास्त राहिले अशा प्रकारामुळे अपघात होत आहेत.
मनपा अभियंत्यांचे देखभालीकडे दुर्लक्ष

यातूनच अपघात
सर्व तक्रारीचे निराकरण आलेल्या सर्व तक्रारीचे निराकरण केला जातो. त्यांचा अहवाल वरिष्ठांना पाठवला जातो. प्रत्येक झोन कार्यालयाकडे विद्युत विभागाचे नियंत्रण अधिकारी आहेत. त्याचे काम आहे कामावर लक्ष ठेवण्याचे - राजेश परदेशी, मनपा विद्युत विभाग
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.