आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूर:आमदार पडळकर यांच्या वाहनावर दगडफेक करणाऱ्या दोघांना अटक, घोंगडे वस्ती परिसरात झाली होती दगडफेक

सोलापूर22 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले होते

भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वाहनावर तीस जून रोजी सोलापुरातील घोंगडे वस्ती परिसरात दगडफेक झाली होती. याप्रकरणी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोघांना शुक्रवारी अटक केली आहे. अमित सुरवसे (वय २४), निलेश क्षीरसागर (रा. सोलापूर) यांना अटक झाली असून त्यांच्याविरुद्ध जोडभावी पेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला होता.

आमदार पडळकर हे ३० जून रोजी घोंगडी बैठकीसाठी सोलापुरात आले होते. घोंगडे वस्ती परिसरात त्यांच्या वाहनावर दगडफेक झाली होती. हल्लेखोर सीसीटीव्हीत कैद झाले होते. त्याआधारे पोलिसांनी त्यांचा शोध घेत होते. उत्तर सोलापूर तालुक्यातील बक्षीहिप्परगे या गावी एका शेतामध्ये लपले होते. त्या दोघांना गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आज अटक केली आहे. फौजदार शैलेश खेडकर व त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दोघांनी दगडफेक का केली, कशासाठी केली याचाही शोध पोलिस घेत आहेत. व आमदार पडळकर यांनी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर पत्रकार परिषदेत बोलताना टीका केली होती. त्यानंतर दगडफेकीचा हा प्रकार घडला होता.

बातम्या आणखी आहेत...