आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मोहोळ तालुक्यातील अनगर येथील लोकनेते अॅग्रो इंडस्ट्रीमध्ये गॅस टाकी फुटून अपघात झाला आहे. टाकी खाली कोसळल्याने वायुगळती झाली. या दुर्घटनेमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर सहा जण जखमी झाल्याची माहिती आहे. लोकनेते साखऱ कारखान्यामध्ये रात्री साडेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
याविषयी पोलिसांनी सांगितले की, शनिवारी रात्री साडेबाराच्या सुमारास कारखान्याचे गाळप सुरू होते. दरम्यान अचानक मिथेन गॅसच्या टाकीत गॅस आणि लिक्वीडचे प्रमाण जास्त झाले. यामुळे टाकी खाली कोसळली. या अपघातामध्ये दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर सहा जण हे गंभीर जखमी आहेत.
ज्योतिबा दादाराव वगरे (वय 45), सुरज अंकुष चव्हाण (वय 22) या दोघांचा मृतांमध्ये समावेस आहे. तर सज्जन जोगदंड (वय 20), मंगेश पाचपुंड (वय 24), महेश बोडके (वय 20), कल्याण गुरव (वय 29), परमेश्वर थिटे (वय25), राजू गायकवाड (वय 20), रवींद्र काकडे (वय 20), संजय पाचे (वय 45) हे जखमी आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.