आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

श्रावण विशेष:सोलापुरात रोज दोन हजार टन फूले होतात दाखल; श्रावणापासून आवक अन मागणी अधिक

सोलापूर7 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रावण मासाच्या पार्श्वभूमीवर सोलापुरात सध्या रोज दोन हजार टणाहून अधिक फूलं दाखल होत आहेत. या फुलांची आवक वाढली असून रतलाम साधे गुलाब पिंक गुलाब काकडा शेवंती निशिगंध गुलबक्षी अशी अनेक फुलं सोलापूरकरांना प्रिय असून याची मागणी जोरदार आहे. मार्केट यार्ड याला होलसेल पद्धतीने खरेदी केल्यावर इतर सर्व सामान्य बाजारपेठेपेक्षा दहावीस रुपयांची किंमत कमी होत असल्याने अनेक मोठ्या प्रमाणावर साजरे केले जाणारे उत्सव प्रेमी पहाटे मार्केटयार्डात धाव घेत आहेत. एरवी एखादं टनाची मागणी असणाऱ्या ग्राहकांच्या तुलनेने श्रावणात मात्र फुलांची मागणी अधिक आहे असे फुल व्यापारी सांगतात.

सोलापुरात रोज पहाटे साडेतीन-चार वाजल्यापासून जवळपास दीड हजार टन केवळ वेगवेगळ्या रंगाचे गुलाब दाखल होत आहेत. यात लाल गुलाब जोमात विकला जातो. तर काकडाझ निशिगंध, रतलाम गुलाब, भाग्यश्री शेवंती आणि इतर छोट्या प्रकारच्या फुलांची ही मोठ्या प्रमाणावर गर्दी सध्या बाजारात पाहायला मिळते आहे. तर इंग्लिश गुलाब या वेगळ्या प्रकारच्या गुलाबाची मागणी बुके व इतर वेगवेगळ्या सजावटीच्या कार्यक्रमासाठी डेकोरेशन साठी केली जाते. या अश्या प्रकारासाठी विकल्या जाणाऱ्या या पेट्यांची मागणी देखील सध्या अधिक आहे. ही सगळी फुले जवळपास ६० टक्क्याहून अधिक सोलापूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून येतात तर जवळच्या जिल्ह्याचा उस्मानाबाद तुळजापूर आणि कर्नाटकच्याही काही गावातून फुल येतात.

असे आहेत सध्या भाव किलोग्रॅम मध्ये

तांबा गुलाब - 80

रतलाम गुलाब- 70

पिंक गुलाब- 60

इंग्लिश गुलाब- 10 रुपये गठ्ठा

शेवंती- 120 किलो

काकडा- 350

निशिगंध- 60

झेंडू - 30

जरबेरा पुण्याहुन - 80 रुपये गठ्ठा

श्रावणापासून आवक अन मागणी अधिक

फुलांचे ठोक व्यापारी संजय लोखंडे म्हणाले की, श्रावण सणापासून हिंदू सणांना मोठ्या प्रमाणावर सुरुवात होते त्यामुळे या सणापासून फुलांची आवक सगळ्यात अधिक सुरू होते. ती दिवाळीच्या पुढील सणांपर्यंत देखील तशीच असते. यंदा भरभरून फुल आली असून सोलापूरकर यंदा कोरोना नंतरच्या या उत्सवांचे स्वागत मोठ्या उत्साहाने करीत आहेत.त्यामुळे मागणी अधिक आहे.

बातम्या आणखी आहेत...