आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Two Were Caught Red handed While Accepting A Bribe Of One And A Half Lakhs; At The Police Station, The Police Inspector Pretended To Be An Acquaintance

गुन्हा दाखल न करण्यासाठी दीड लाख मागितले:लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना ठोकल्या बेड्या

सोलापूर11 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक परिचयाचे आहेत असे सांगून गुन्हा दाखल करू नये यासाठी लाचेची मागणी केल्याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांना रंगेहात पकडले आहे. युवराज भीमराव राठोड (वय 37 वर्षे), साजन रमेश हावळे (वय, 36 वर्षे) अशी त्यांचे नावे आहेत.

दोघांविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 चे कलम 7 (अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिकारी पर्यवेक्षण अधिकारी सापळा पथक सोलापूर युनिट, पुणे परिक्षेत्र विजापूर नाका पोलिस ठाणे सोलापूर शहर येथे गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा कलम 7, (अ) प्रमाणे खाजगी व्यक्ती, युवराज भीमराव राठोड (वय 37 वर्षे), साजन रमेश हावळे (वय, 36 वर्षे) यांनी 1,50,000/- रुपये लाचेची मागणी केली.

पडताळणी दिनांक 20/07/2022 प्राप्त तक्रारीनुसार तक्रारदाराविरुध्द सोलापूर शहर येथील पोलिस स्टेशन येथे दाखल असलेल्या अर्जामध्ये सहकार्य करून त्यांच्याविरुध्द दाखल अर्जावरून गुन्हा दाखल न करण्याकरिता पोलिस स्टेशन येथील पोलिस निरीक्षक हे आमच्या चांगल्या परिचयाचे आहेत असे सांगितले. तक्रारदार यांच्याकडून 1,50,000 /- ( दीड लाख) रुपये लाचेची मागणी केली. पंचासमक्ष पडताळणी पंचनाम्यामध्ये निष्पन्न झाल्याने दोन्ही आरोपीविरुध्द गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

ही कारवाई पोलिस अधीक्षक लाप्रवि पुणे अमोल तांबे, अपर पोलिस अधीक्षक, लाप्रवि पुणे सुरज गुरव, पोलिस उपअधीक्षक, लाप्रवि, सोलापूर गणेश कुंभार, पोलिस निरिक्षक उमाकांत महाडिक, शिरीषकुमार सोनवणे, अर्चना स्वामी, अतुल घाडगे, श्रीराम घुगे, स्वप्नील सन्नके, यांनी केली.

भ्रष्टाचारासंबंधीत काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल अथवा त्याच्यावतीने लाच मागणाऱ्या खाजगी व्यक्तींबद्दल तक्रार असल्यास त्वरीत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे टोल फ्री क्रमांक 1064 अगर दुरध्वनी क्रमांक 0217-2312668 वर संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे.

बातम्या आणखी आहेत...