आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपघात:ट्रकच्या धडकेने दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू; पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद

पंढरपूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

एका ट्रकने शिक्षिकेच्या दुचाकीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर सोबत असलेला त्यांचा १४ वर्षीय मुलगा जखमी झाल्याची घटना सोमवारी पंढरपुरातील सरगम चौकाजवळ घडली आहे. याप्रकरणी पंढरपूर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

येथील एका शिक्षण संस्थेत कार्यरत असलेल्या दीपाली अमोल इनामदार (वय ३६, रा. मनीषानगर, पंढरपूर) या आपला मुलगा आर्यन अमोल इनामदार (वय १४) सोबत दुचाकीवरून (एमएच १३ बीके ९८४४) कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाकडून भाजी मंडईकडे जात होत्या. या दरम्यान सुलभ शौचालयजवळ सरगम चौक पंढरपूर येथे पाठीमागून येणाऱ्या ट्रकने (एमएच ११ एम ३५९४) भरधाव वेगात पाठीमागून धडक दिली. या अपघातात दीपाली यांच्या अंगावरून ट्रक गेल्याने दीपाली अमोल इनामदार यांचा जागीच मृत्यू झाला. मुलगा आर्यन जखमी झाला. धनंजय दिलीप पंधे (पंढरपूर) यांनी दिली आहे.

बातम्या आणखी आहेत...