आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकी चोरी:मार्केट यार्डात  बनावट चावीने चोरायचे दुचाकी, 29 गाड्या केल्या हस्तगत

सोलापूर25 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जेल रोड पोलिस ठाणे हद्दीतील मार्केट यार्डातून चोरीला गेलेल्या काही गाड्यांचा सुगावा लावण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. मार्केट यार्डातून मागील वर्षभरात ४३ दुचाकी चोरीला गेल्या होत्या. त्यातील २९ गाड्या तीन चोरट्यांकडून हस्तगत केल्या असून २७ गुन्हे उघडकीस आल्याची माहिती पोलिस आयुक्त राजेंद्र माने यांनी दिली.

मागील दोन महिन्यांपासून सहायक पोलिस निरीक्षक दादासाहेब मोरे व त्यांचे पथक दुचाकी चोरट्यांचा शोध घेत होते. त्या दरम्यान पथकास एक व्यक्ती बोरामणी नाका येथे चोरीची दुचाकी विक्रीस येणार आहे अशी खबर होती. त्यानुसार पथकाने सापळा रचून मच्छिंद्र भागवत जाडकर (वय ३६ रा. सिंदवाडा मोडनिंब ता. माढा) यास बोरामणी नाका या ठिकाणाहून अटक केली आहे. त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने त्याचे दोन साथीदार सचिन जालिंदर चव्हाण (वय ३६, मोडनिंब, मा माढा) दत्तात्रय रावसाहेब शेळके (वय २५ अरण, ता. माढा) यांच्या मदतीने वर्षभरात एकूण २९ दुचाकी चोरी केल्याची कबुली दिली. मागील काही महिन्यापासून शहरासह सोलापूर बाजार समितीत मोटारसायकल चोरीच्या घटना वाढल्या होत्या. आरोपींनी मार्केट व परिसरातील दुचाकी बनावट चावीचा वापर चोरल्या होत्या. गुन्हे शाखेकडून एकूण ८ लाख ४५ लाख रुपये किमतीच्या दुचाकी हस्तगत केल्या आहेत.

सीसीटीव्ही बसवण्याच्या सूचना : मार्केट यार्डात नेहमीच वर्दळ व गर्दी असते. या गर्दीचा फायदा घेत मार्केट यार्डातून वारंवार दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना घडत आहेत. चांगल्या दर्जाचे कॅमेरे बसवण्याचा सूचना पोलिस आयुक्तालयाकडून दिलेल्या आहेत. तसेच मार्केट समोरील हॉटेलचालकांनीही फक्त कॅमेरा हॉटेलपुरता न लावता सामाजिक जबाबदारी म्हणून लावावा, अशा सूचना दिलेल्या आहेत.

८ महिन्यांत १९४ दुचाकी चोरीला
शहरातील विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये जानेवारी ते आगस्टपर्यंत १९४ दुचाकी चोरीच्या घटना घडल्या आहेत. त्याविषयी तपास सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांकडून सांगितले. फक्त जेलरोड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत गुन्हे उघडकीस आल्याची माहिती देण्यात आली.

बातम्या आणखी आहेत...