आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी चार दिवसांत घेतला शोध:चिमुकलीला पळवून नेणाऱ्या दोन महिलांना रेल्वेतून घेतले ताब्यात

सोलापूरएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईतल्या जुहू विभागातून चार दिवसांपूर्वी अपहरण केलेल्या एक वर्षाच्या चिमुकल्या फातिमाला हुसेनसागर एक्स्प्रेसने मुंबईला नेणाऱ्या दोन महिलांना रेल्वे सुरक्षा बल व मुंबई क्राइम ब्रँच पोलिसांनी बुधवारी सकाळी सोलापूर स्थानकावर ताब्यात घेतले आणि चिमुकल्या फातिमाला दुरावलेल्या आईच्या स्वाधीन करण्यात आले. महिला कर्मचाऱ्यांनी यात विशेष कामगिरी केली. चार दिवसांत मुलीला शोधून काढले.

३० ऑक्टोबर रोजी जुहूच्या रस्त्यावरून फातिमाचे अपहरण झाले होते. याबाबत फातिमाची आई मुस्कान शेख यांनी जुहू पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर पोलिसांनी सूत्र हलवत संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज तपासणी सुरू केली. त्यानंतर एक महिला त्या बाळाला घेऊन लोकलमधून उतरताना सीसीटीव्ही फुटेज दिसली. दरम्यान, त्या महिलांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या पोलिस समूहांमध्ये फोटो फिरवले तसेच दक्षिण भारतातील आरपीएफला देखील याची माहिती दिली.

त्यानुसारच या महिला हैदराबादला जाऊन पुन्हा मुंबईकडे परत येत आहेत आणि त्यांच्यासोबत बाळही आहे याची माहिती मिळाली. त्यानंतर सापळा रचून मुंबईतून जुहूचे क्राइम ब्रँच पथक आणि सोलापूरचे रेल्वे सुरक्षा बलाचे पथक यांनी त्यांना मुलीसह पकडले. या कारवाईत “आहट ” पथकाचे पोलिस निरीक्षक सिद्धराम म्हेत्रे यांच्यासह मुंबई क्राइम ब्रँचचे सहा सहकारी तसेच निरीक्षक सतीश विधाते, अनुज पटेल, श्याम सिंह,नागनाथ मामुरे, महिला अधिकारी उर्वशी मनोज यादव शम्भू कुमार, अनिल गवळी, अनिल धोटे आदींचा समावेश होता. त्यांनी प्रकरणात सर्वात अधिक वेगाने काम केले आणि चार दिवसांत मुलीचा शोध घेतला.

चिमुकलीला विकण्यासाठीच त्या हैदराबादला गेल्या ? : मानवी तस्करी किंवा त्या चिमुकलीला विकून व्यवहार करण्यासाठीच या महिला तिकडे गेल्या असाव्यात असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. त्यानुसार तिथे व्यवहारात काही तरी फिस्कटले असणार आणि त्यानंतर या महिला पुन्हा मुंबईकडे जात असाव्यात अससा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

नातेवाइकांच्या मोबाइलवरून ट्रॅप
सीसीटीव्ही फुटेजवरून महिलांचा या शोध घेण्यात आला. त्या मुंबईतील विलेपार्ले येथील मिठीबाई कॉलेजजवळ राहत असल्याचे समजले. सुदेता पासवान (४२ ), शरीफा शेख (५०) असे यांचे नाव आहे. त्यानंतर नातेवाइकांच्या मोबाइलवरून त्यांच्याशी संपर्क ठेवत त्यांना ट्रॅप केले.

बातम्या आणखी आहेत...