आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आमदार नितेश राणे यांनी जहरी टीका केली. घरात बसून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ना कंटाळा आला असेल ना, अशा शब्दात खिल्ली उडवत त्यांनी घराबाहेर पडावे, मर्दासारखे लढावे आणि आमच्याशी लढावे असे खुले आव्हान भाजप आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिले. दाऊदच्या माणसासोबत मांडीला मांडी लावून बसतात. शिवसेनेसोबतच राष्ट्रवादीही दाऊदची बी टिम असून बाळासाहेबानंतर देवेंद्र फडणवीस हेच हिंदुहृदयसम्राट आहे असेही ते म्हणाले. उद्धव ठाकरे सरकारकडून राणे कुटुंबावर टाच आणली जात आहे. त्यांच्यातील सख्य विळ्या-भोपळ्यांचे असल्याने राणे कुटुंबिय टीका करण्याची एकही संधी सोडत नाही. त्यातूनच या जहरी टीकेची खदखद समोर आली.
नोटीस पाठविणे हे मर्दाचे काम नाही अशी टीकाही त्यांनी मुख्यमंत्री ठाकरेंवर केली. आमदार आमदार राणे आपल्या कुटुंबीयांसोबत सोमवारी तुळजाभवानी मातेचे दर्शन घेण्यासाठी सोलापूर विमानतळावर आले होते, त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला .
ते म्हणाले की, आताची शिवसेना बाळासाहेबांची नाही ती दाऊदची बी टिम झाली. शिवसेनेने हिंदुत्व कधीच सोडले म्हणून ते आज अजाणच्या स्पर्धा घेतात. जनाब बाळासाहेब ठाकरे हे सेनेच्या बॅनरवर शिवसेनेने लिहिले आहे.
राऊतांसारखी माणसे बाजारात भेटतात
संजय राऊत यांच्यावर टीका करताना नितेश राणे म्हणाले की, संजय राऊत यांच्यासारखी माणसे सोलापूरच्या बाजारात खूप भेटतात. अशांना किती किती महत्त्व द्यायचे हे मी ठरवून घेतले आहे. काश्मीर फाईल्स या चित्रपटाविषयी ते म्हणाले की ज्यांना हिंदू विषयी द्वेष आहे ते लोक काश्मीर फाईलच्या विरोधात बोलत आहेत असेही ते म्हणाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.