आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Solapur
  • Ujjain Released Water From The Canal For The Summer Season, Will Be Released Into The River On Demand; Farmers Expressed Satisfaction | Marathi News

समाधान:उजनीतून उन्हाळी हंगामासाठी कालव्यातून पाणी सोडले, मागणीनंतर नदीत सोडणार; शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले

टेंभुर्णी4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

उजनी धरणातून उन्हाळी हंगामासाठी शेतीकरिता मुख्य कालव्यातून पाणी सोडले आहे. तर सोलापूर महापालिकेने मागणी केल्यास भीमा नदीपात्रात पाणी सोडण्यात येणार असल्याचे अधीक्षक अभियंता धीरज साळे यांनी सांगितले. उन्हाळी हंगामासाठी शेतीकरिता उजनी मुख्य कालव्यातून मंगळवारी (‌दि. ५) सकाळी ११ वाजता ५०० क्युसेक विसर्गाने पाणी सोडले आहे. उजनी धरणात सध्या एकूण ९२.९७ टीएमसी पाणीसाठा अाहे. ३३.७६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. सध्या शेतकऱ्यांना उसासह उन्हाळी पिकांना पाण्याची गरज होती. विशेष म्हणजे तोडणी झालेल्या खोडवा उसाला पाण्याची अधिक गरज होती. पूर्ण एक महिना हे आवर्तन सुरू राहणार आहे. त्यानंतर पुन्हा आणखी एक आवर्तन सोडले जाणार आहे. वेळेत कालव्यास पाणी सोडल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले आहे.

सध्या भीमा नदीपात्रात पाणी सोडण्याची मागणी नाही. शेतकऱ्यांसह सोलापूर महापालिकेने मागणी केल्यास नदीतून आवर्तन सोडण्यात येणार आहे. पावसाळा लांबणीवर पडल्यास शेतकऱ्यांना जून व जुलै महिन्यात या आवर्तनाची खरी गरज असते. त्यानुसार पाणी सोडण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत होईल. हे पाणी मुख्य कालव्यातून उजनी डावा व उजनी उजव्या कालव्यात तीन हजार २०० क्युसेक इतक्या पूर्ण क्षमतेने पाणी सोडण्यात येणार आहे.

गतवर्षीच्या तुलनेत १३ टीएमसी अधिक पाणीसाठा : गतवर्षी पाच एप्रिलला उजनीची पाणीपातळी ३७.५७ टक्के होती. एकूण ८३.८७ टीएमसी तर उपयुक्त २०.१३ टीएमसी पाणीसाठा होता. गतवर्षीच्या तुलनेत यंदा सध्या उजनी धरणात १३ टीएमसी अधिक पाणीसाठा आहे. सध्या ३३.७६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा उपल्ब्ध आहे. ६१.०१ टक्के पाणीपातळी आहे.

बातम्या आणखी आहेत...