आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आव्हान:उकाड्यामुळे पहाटे दार उघडले अन् 21 हजारांचा ऐवज चोरीला; चोरट्याचे वाढते धाडस, पोलिसांसमोर आव्हान

सोलापूर17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

रात्री उकाड्याने हैराण झालेल्या व्यक्तीने पहाटे घराचे दार उघडे ठेवले. याची संधी साधत अज्ञात चोराने घरातील २१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. याबाबत विजापूर नाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

ईश्वर खंडप्पा निंगशेट्टी ( वय ३२,रा. मोहिते नगर होटगी रोड) हे पहाटेच्या सुमारास नैसर्गिक विधीसाठी उठले. पहाटे थंड वारा सुटला होता म्हणून त्यांनी घरचे दार उघडे ठेवले. याची संधी साधत अज्ञात चोराने घरात प्रवेश करून घरातील मोबाइल, कर्णफुले, तीन हजार रुपये रोख, असा एकूण २१ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला, अशी फिर्याद विजापूर नाका पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कपडे बदलायला बेडरूममध्ये गेले अन् घरातील पैसे पळवले शहरात दररोज रात्री चोरीच्या घटना घटना घडतच आहेत. त्यात आता दिवसाढवळ्या घरातून चोरी व्हायचे सुरू झाले आहे. असाच एक प्रकार घोंगडे वस्तीत घडला आहे. याबाबत जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सुरेश रामकृष्णसा बिद्री (वय ५५, रा. भवानी पेठ, भाजी मार्केट, घोंगडे वस्ती) हे घरातील सोफ्यावर मोबाइल आणि पैशाची पाकीट ठेवून कपडे बदलण्याकरीता घरातील बेडरूममध्ये गेले. तेवढ्यात अज्ञात चोराने घरात प्रवेश करून हॉलमधील सोफ्यावर ठेवलेले पैशाचे पाकीट आणि मोबाइल चोरून नेले. आठ हजार रुपये किमतीचा मोबाइल आणि पाकिटात २५०० रुपये होते. अशी फिर्याद सुरेश बिद्री यांनी जोडभावी पेठ पोलिस ठाण्यात दाखल केली. यावरून अज्ञात चोराविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...