आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासाेलापूर सिद्धेश्वर सहकारी बँकेच्या निवडणुकीतील उमेदवारी अर्जांची साेमवारी छाननी झाली. तीत सर्वसाधारण मतदारसंघातील पाच आणि आेबीसी मतदारसंघातील एक अशा एकूण सहा अर्जांवर आक्षेप घेण्यात आला. त्यावर उद्या बुधवारी निर्णय देणार असल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी कुंदन भाेळे म्हणाले.
माजी नगरसेवक केदार उंबरजे, विवेक बरबडे, रतन रिक्के, धनंजय पुुजारी आणि बसवराज बगले यांच्या अर्जांवर हे आक्षेप आहेत. श्री. बगले यांनी आेबीसी मतदारसंघातही अर्ज दाखल केला आहे. त्यावरही हरकत आली. सर्व हरकती कायदेशीर बाबींवर आधारित आहेत. कोणाच्या समभागाची रक्कम पुरेशी नाही, तर कोणाची बँकेत ठेव नाही. क्रियाशील सदस्यत्वाच्या निकषावरही या हरकती आहेत. बँकेच्या १५ जागांसाठी ५६ अर्ज आले. उमेदवारी अर्ज वैध असलेल्यांची यादी बुधवारी प्रसिद्ध हाेईल.
लाेकमंगल बँकेची छाननी; जाधव यांचा अर्ज नामंजूर
लाेकमंगल सहकारी बँकेच्या सर्वसाधारण मतदारसंघातील १२ जागांसाठी १४ अर्ज आले हाेते. पैकी साेमवारी झालेल्या छाननीत विजय जाधव यांचा अर्ज नामंजूर केल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ए. ए. गावडे यांनी दिली. २३ नाेव्हेंबरपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत आहे. त्यानंतरच निवडणुकीचे चित्र स्पष्ट हाेईल. या मतदारसंघाशिवाय इतर मतदारसंघ अविराेध झाले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.