आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस भवनावर हल्ला:सोलापूरमध्ये अज्ञातांकडून काँग्रेस भवनावर हल्ला, दगड आणि शाई फेकून हल्लेखोर फरार

19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापुरातील काँग्रेस भवनवर अज्ञात हल्लेखोरांनी दगड आणि शाई फेकल्याचा प्रकार घडला आहे. ही घटना शनिवारी सकाळी घडली आहे. काँग्रेस भवन येथे हल्ला झाला याची माहिती मिळताच सोलापुरातील काँग्रेसचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते काँग्रेस भवनकडे आले घटनेची माहिती घेतली.

काँग्रेस भवन समोरील बाजूस माजी केंद्रीय मंत्री सुशील कुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांचे मोठे बॅनर लावण्यात आले आहेत. अज्ञात हल्लेखोरांनी काँग्रेस भवन समोरील भागात असलेल्या बॅनरवर शाई फेकून निघून गेले.

दरम्यान, या घटनवेर काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रकाश वाले यांनी काँग्रेस भवन येथे येऊन पाहणी केली. चार दिवसांपूर्वी सोलापुरातील काँग्रेस भवन येथे बैठक सुरू असताना काँग्रेस कार्यकर्त्यांनी शहर अध्यक्ष प्रकाश वाले यावर नाराजी व्यक्त करत वाद केला होता. वाद मोठ्या प्रमाणात होऊन एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. पण काँग्रेसच्या इतर पदाधिकऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी मध्यस्ती करत हा वाद मिटवला होता. यावर माहिती देण्यास काँग्रेसच्या शहर अध्यक्षकांनी टाळाटाळ केली. त्यांनी विरोधकांवर आरोप करत विरोधी पक्षावर निशाणा साधला.

घटनेची माहिती मिळताच जेलरोड पोलीस ठाण्याचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक शिंगाडे हे घटनास्थळी आले आणि पंचनामा करून अज्ञात समाजकंटकांविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली.

बातम्या आणखी आहेत...